Uday Samant on Tanaji Sawant: नाराज तानाजी सावंतांवर उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले..

Uday Samant on Unhappy MLAs over dropped form Cabinet: तानाजी सावंत, विजय शिवतारे हे ज्येष्ठ नेते आहेत. ते देखील मंत्रि‍पदासाठी पात्र आहेत. काही मंत्री नाराज आहेत. नाराज नेत्यांची नाराजी लवकरात लवकर दूर करू.
Uday Samant on Tanaji Sawant
Uday Samant on Tanaji Sawantsaam tv
Published On

'शिवसैनिकांच्या जीवावर शिवसेना चालतीय. मंत्रिपद मिळालं नाही, म्हणून काही नेते नाराज आहेत. परंतु, शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक कुटुंब म्हणून काम करत आहोत. आम्ही मंत्री झालो, आमची जबाबदारीही वाढली आहे. पक्षातील नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.' असं मंत्री उदय सामंत म्हणाले. 'तसंच आम्ही काही नाराज नेत्यांना भेटलो आहोत. त्यांची नावं सांगणार नाही.' असंही उदय सामंत म्हणाले.

नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न

एखाद्याला मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे नाराजी निर्माण होऊ शकते. परंतु, शिवसैनिक म्हणून आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक कुटुंब म्हणून काम करत आहोत. आम्ही मंत्री जरी झालो असलो तरी, आमची जबाबदारीही वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं. 'पण जर मंत्रिपद देऊनही चांगलं काम केलं नाही, तर आम्हाला दिलेलं मंत्रिपदही काढून घेऊ शकतात. ही देखील भीती आमच्या सर्वांच्या मनात आहे. त्यामुळे आम्हाला देखील जनतेला अभिप्रेत असं काम केलं पाहिजे, सर्व आमदारांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे.' असं उदय सामंत म्हणाले.

Uday Samant on Tanaji Sawant
Maharashtra Cabinet Expansion: ऐनवेळी मंत्रिपदाच्या यादीतून माझं नाव कोणी कापलं? नाराज मुनगंटीवारांचा सवाल

तानाजी सावंत यांची नाराजी दूर करू

'तानाजी सावंत, विजय शिवतारे हे ज्येष्ठ नेते आहेत. ते देखील मंत्रि‍पदासाठी पात्र आहेत. काही मंत्री नाराज आहेत. माझ्यासोबतही पहिल्या टर्मला असंच घडलं होतं. गेल्या अडीच वर्षात मी दीड हजार कोटी मतदारसंघ पिंजून काढला होता. नाराज नेत्यांची नाराजी लवकरात लवकर दूर करू.' असं उदय सामंत म्हणाले.

'एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली आहे. आज आम्ही मंत्री झालो. पण पुढे जाऊन जर, आम्ही चांगलं काम केलं नाही. तर, आम्हाला दिलेलं मंत्रिपद काढून घेऊ शकतात.' असंही उदय सामंत म्हणाले.

Uday Samant on Tanaji Sawant
Tanaji Sawant : विकास न झालेलं गाव दाखवा आणि १ लाख मिळवा, तानाजी सावंतांचे मतदारांना चॅलेंज!

विधान परिषद सभापती

'मंत्रिमंडळ खातेवाटप, सभापती किंवा इतर सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत. खातेवाटपात आपल्या नेत्याला मोठं पद मिळावं, अशी भावना अनेकांची असते. त्यात काही वावगंही नाही. मात्र, तिन्ही नेते चर्चेतून सुवर्णमध्य काढतील. तसेच आज किंवा उद्या तिन्ही नेते चर्चा करून खातेवाटप जाहीर करतील.' असंही उदय सामंत म्हणाले.

लवकरात लवकर खातेवाटप होईल

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य ते त्यांच्या विभागासंदर्भात कार्यवाही सुरू करतील. असं मुख्यमंत्री स्वत: म्हणाले. त्यामुळे खातेवाटपामध्ये कोणताही तिढा नाही. खाते वाटपात कोणताही समन्वय नाही असा कोणताही विषय नाही. तिन्ही नेते एकत्र बसून, दोन दिवसांमध्ये निर्णय घेतील'. असं उदय सामंत म्हणाले. 'तसेच खातेवाटप जरी झालं नसलं तरी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. त्यामुळे खातेवाटप लवकरात लवकर होईल'. असंही सामंत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com