Tanaji Sawant On Maratha Aarakshan Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Reservation: यांच्यासारख्या मराठाद्रोही सरंजामी मराठ्यामुळेच...; तानाजी सावंतांच्या 'त्या' विधानानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक

Maratha Reservation Latest News: मंत्री तानाजी सावंत हे मराठाद्रोही असल्याची बोचरी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर, पुणे

पुणे: मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) वादग्रस्त विधान करणं सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांना चांगलच भोवलं आहे. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केलेल्या विधानाचा अनेक मराठा संघटनांनी निषेध केला असून राज्यभरातून त्यांच्यावर टीका होतेय. याबाबत आता संभाजी ब्रिगेडनेही (Sambhaji Brigade) मंत्री तानाजी सावंत यांना धारेवर धरलं आहे. मंत्री तानाजी सावंत हे मराठाद्रोही असल्याची बोचरी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केली आहे. तसेच मंत्री सावंताविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला आहे. (Tanaji Sawant Latest News)

मंत्री तानाजी सावंताविरोघात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे म्हणाले की, "मंत्री तानाजी सावंतसारख्या मराठाद्रोही सरंजामी मराठ्यामुळेच मराठा-ओबीसीकरण रेंगाळलेले आहे. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश झाला पाहिजे ही संभाजी ब्रिगेडची गेल्या ३० वर्षांपासूनची मागणी आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री तानाजी सावंत यांना मराठा समाज धडा शिकवेल." असा जाहीर इशारा संभाजी ब्रिगेडकडून मंत्री तानाजी सावंत यांना देण्यात आला आहे.

नेमकं काय म्हणाले होते तानाजी सावंत?

उस्मानाबाद जिल्ह्यातील एका मेळाव्यात बोलताना तानाजी सावंत म्हणाले होते की, '२०१९ मध्ये तुम्ही लोकांचा विश्वासघात करून सत्तेत आले. त्यानंतर पुढच्या ६ महिन्यांत आरक्षण गेलं, तेव्हा आंदोलन वगैरे झालं नाही, सगळे शांत बसले. पण जसंच सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली', असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री तानाजी सावंतांनी केलं आहे, ज्यामुळे आता त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. (Tanaji Sawant On Maratha Aarakshan)

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, अचानक आलेल्या पावसाने उडाली पुणेकरांची दाणादाण; पाहा VIDEO

Varicose Veins: ९ ते ५ ऑफिसमध्ये बसून काम करणं धोक्याचं, वेळीच जाणून घ्या नुकसान आणि शरीरावर होणारे गंभीर परिणाम

Maharashtra Live News Update : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

Pakistan Attack News : लेफ्टनंट कर्नल, मेजरसह लष्काराच्या ११ जवानांचा मृत्यू; पाकिस्तान दहशतवादी हल्ल्याने हादरला

ICC Rankings: ICC टेस्ट रँकिंगमध्येही सिराज-जडेजाचा कहर; नंबर 1 ताजही बुमराहकडे कायम, 'या' फलंदाजाचं मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT