सुशांत सावंत, मुंबई
मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. मविआ सरकार कोसळ्यानंतर आता शिंदे गट आणि भाजप यांची नजर मुंबई महापालिकेवर (BMC Election 2022) आहे. मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून (BJP) आता 'मंत्री तुमच्या दारी' हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून या उपक्रमाची सुरूवात होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर थेट जनतेत जाऊन जनतेशी जुळवून घेण्याचा भाजपचा हा नवा फॅार्म्युला आहे. (BMC Election 2022 Latest News)
मुंबईकरांनी साद घालण्यासाठी आणि मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपचा हा नवा फॅार्म्युला आहे. पालकमंत्रिपद मिळताच मंगलप्रभात लोढा हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. यानुसार मुंबईकरांसाठी आता 'पालकमंत्री तुमच्या दारी' हा उपक्रम राबण्यात येणार आहे. यानुसार मुंबई आणि उपनगरतील सर्व महापालिका वॅार्डात भाजप जनता दरबार घेणार आहे. या जनता दरबारातून मुंबईकरांच्या अडी-अडचणी सोडवण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. तर महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात पालकमंत्र्यांचा जनता दरबार होणार आहे. ॲाक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भाजपतर्फे जनता दरबार हा उपक्रम सुरू होणार आहे.
सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेचे सत्ता आहे. पण, एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर अनेक नगरसेवक हे शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळे यंदाची बीएमसी निवडणुक ही शिवसेनेसाठी तारेवरची कसरत करणारी ठरेल. शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडल्याने भाजपची ताकद वाढली असून मुंबईत एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप कसून प्रयत्न करत आहे. गणेशोत्सवात स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आले होते. तर प्रत्येत सण हा भाजपकडून जल्लोषात साजरा करुन जनतेत अधिकाधिक जाण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याशिवाय भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील मुंबई महापालिका निवडणुकीत विजयासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.
२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत, शिवसेना ९३ जागा, भाजप ८२ जागा, काँग्रेस ३१ जागा, रा.काँग्रेस ९ जागा, मनसे १ जागा, सपा ६ जागा, एमआयएम २ जागा आणि अपक्ष ६ जागा असं समीकरण होतं. भाजपने मागच्या निवडणुकीत ८२ जागा जिंकत शिवसेनेला चांगलाच धक्का दिला होता. महापौर शिवसेनेचा झाला असला तरी भाजपने शिवसेनेला आपली महात्वाकांक्षा दाखून दिली. त्यामुळे यंदा आपली सत्ता टिकवण्यासाचं आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.