Taloja MIDC Accident Video Saam Tv
मुंबई/पुणे

Taloja MIDC Accident : २ पावलांवर मृत्यू बघितला, स्वतःला वाचवणार; तोच सुस्साट कारनं उडवलं, भीषण अपघाताचा CCTV

Taloja MIDC Accident News : नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसीमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव कारने रस्त्यावरुन चालत जाणाऱ्या दोघांना उडवले आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Yash Shirke

Taloja Accident News : नवी मुंबईतून एक मोठी माहिती समोर आली आहे. नवी मुंबईच्या तळोजा एमआयडीसीमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका कारने रस्त्यावरुन चालत जाणाऱ्या दोघांना उडवले आहे. ही घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आज (१४ जानेवारी) नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसी येथील शिवजागृती हॉटेलसमोर भयानक अपघात झाला आहे. भरधाव कारने रस्त्यावरुन जाणाऱ्या दोघांना उडवले आहे. रस्त्याच्या सीसीटीव्हीमध्ये भीषण अपघात कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये रस्त्यावरुन एक महिला आणि एक तरुण रस्त्याच्या कडेने चालत जात असल्याचे दिसते. काही क्षणातच कार महिला आणि तरुणाला उडवून पुढे जाते. भरधाव येणारी कार महिलेने पाहिली होती. ती बाजूला जाणार इतक्याने कारने झडप घातली.

या दुर्घटनेमध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर महिला गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमी महिलेवर सध्या कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरु झाले आहेत. महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

वाहनचालक वेगाने कार चालवत होता. कार चालवत असताना नियंत्रण सुटल्याने वाहनचालकाने त्या दोघांना उडवले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान या अपघाताप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोजा पोलिस या घटनेचा तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: "भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय"; अनिल गोटेंचा सरकारवर घणाघात

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

SCROLL FOR NEXT