Vashi accident news: नाईट शिफ्ट करून घरी परतताना काळाचा घाला, कारच्या धडकेत २ तरूणींचा मृत्यू

Vashi accident news: नवी मुंबईच्या वाशीमध्ये भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला असून, या रस्ता अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
Navi Mumbai
Navi MumbaiSaam Tv News
Published On

नवी मुंबईच्या वाशीमध्ये भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोन मुलींचा मृत्यू झाला असून, या रस्ता अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या अपघातात कारने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरात बसली, ज्यात दुचाकीवर प्रवास करणाऱ्या दोघींचा अपघाती मृत्यू झाला आहे. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये अपघात घडताना कार दुचाकीला कशी धडकते हे स्पष्ट दिसत आहे.

दोन्ही मुलींचा मृत्यू

नवी मुंबईच्या वाशीमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. या अपघाता रस्त्यावरून जात असलेल्या चारचाकीने दुचाकीला जबर धडक दिली. ही धडक इतकी जोरात बसली की, दुचाकीवर बसलेल्या दोघी दूर फेकल्या गेल्या. या अपघातात त्या दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला असून, अपघाती मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Navi Mumbai
Kolhapur Gang: कोल्हापुरात 'मुळशी' पॅटर्न! अल्पवयीन गुन्हेगारांचा नंगानाच; आधी रिल तयार केलं, नंतर तरूणाला संपवलं

मृत मुलींमध्ये एकीचे नाव संस्कृती (वय वर्ष २२), तर दुसरीचं नाव अंजली पेंडसे (वय वर्ष १७) आहे. संस्कृती कामोठेमध्ये राहत होती, तर अंजली कोपरखैरणे येथील रहिवासी होती. दोघेही नाईट शिफ्ट करून जात होते. शिवाय दुचाकीरून मुली चुकीच्या दिशेने जात होते. समोरून भरधाव आलेल्या कारने धडक दिली. ज्यात दोघांचाही अपघाती मृत्यू झाला आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, हा अपघात किती भीषण असेल, याची नक्कीच आपल्याला कल्पना येईल.

Navi Mumbai
Pune Traffic : पुणेकरांचा वाहतूक कोंडीतही झेंडा! पुण्यात जगातील चौथ्या क्रमांकाचे ट्रॅफिक

अपघातस्थाळावरून बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या दुसऱ्या लेनमध्ये एक भरधाव कार येताना दिसत आहे. त्याच्यासमोरून मुली दुचाकीवरून येत आहेत. मात्र, भरधाव इतकी वेगाने येते, की दुचाकीला जोरा धडक बसते. ही धडक इतकी जोरात बसते की यात दोन्ही मुली दूर फेकल्या जातात आणि जागीच त्यांचा मृत्यू होतो. या प्रकरणी पोलिसांनी धाव घेत तपासाला सुरूवात केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास आणि कारचालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com