Kolhapur Gang: कोल्हापुरात 'मुळशी' पॅटर्न! अल्पवयीन गुन्हेगारांचा नंगानाच; आधी रिल तयार केलं, नंतर तरूणाला संपवलं

Kolhapur Youths: कोल्हापुरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ६-७ तरूणांनी आधी कोयता घेऊन चिथावणी खोर रिल्स तयार करून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. याच तरूणांनी एकाची निर्घृण हत्या केली.
Kolhapur Violence
Kolhapur ViolenceSaam Tv News
Published On

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

संपूर्ण राज्यात गुन्हेगारांच्या प्रकरणांमध्ये वाढ होत चालल्याचं चित्र आहे. राज्यातील ठिकठिकाणी मुळशी पॅटर्नसारख्या घटना घडताना दिसतायत. भर चौकात तरूण आणि अल्पवयीन मुलं हातात कोयता आणि बंदुके घेऊन सर्रास कायद्याचे धिंडवडे काढताना दिसत आहेत. अशातच कोल्हापुरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ६-७ तरूणांनी आधी कोयता घेऊन चिथावणी खोर रिल्स तयार करून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. याच तरूणांनी एकाची निर्घृण हत्या केली.

कोल्हापुरातील गांधीनगर परिसरात तरुण आणि काही अल्पवयीन मुलांना कोयता घेऊन हैदोस माजवला आहे. बी के ग्रुप असं कोयता गँगचं नाव असून, यात ५ तरूण आणि २ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. ही मुलं कोयते, तलवारी घेऊन चिथावणी खोर रिल तयार करतात आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात. रिल ठेवण्याच्या दुसऱ्याच दिवशी या गँगनं एक तरूणाची निर्घृणपणे हत्या केली आहे.

Kolhapur Violence
ST Bus Accident: रत्नागिरीच्या शेनाळे घाटात भीषण अपघात, झाडामुळे एसटी बस धरणात पडता पडता वाचली; ७ प्रवासी जखमी

विठ्ठल शिंदे असे मृत तरूणाचे नाव असून, १० जानेवारीला त्याच्यावर हल्ला केलाय. ६- ७ तरूणांनी मिळून विठ्ठल याची निर्घृणपणे हत्या केली. विठ्ठलवर सपासप वार केल्याने विठ्ठलचा संपूर्ण चेहरा विद्रूप झाला. तर विठ्ठलच्या दोन्ही हातांची बोटे तुटली. या धक्कादायक प्रकरणानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने ७ आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतलं. ७ आरोपींपैकी २ आरोपी अल्पवयीन असून, ५ आरोपी २१ ते २३ या वयोगटातील आहेत.

Kolhapur Violence
Delivery boy: कल्याणमध्ये डिलिव्हरी बॉयचा प्रताप, कारवाई टाळण्यासाठी नंबर प्लेटवर लावले स्टिकर्स

कोल्हापुरात एका बाजूला आरोपींना दुग्धाभिषेक घातला जातोय. तर दुसर्‍या बाजूला आरोपी वेगवेगळे रिल्स ठेवून दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व प्रकारावरून कोल्हापुरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे की नाही ? असा प्रश्न निर्माण झालेला असून, या रिल्स आणि वाढत चाललेल्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com