Pune Traffic : पुणेकरांचा वाहतूक कोंडीतही झेंडा! पुण्यात जगातील चौथ्या क्रमांकाचे ट्रॅफिक

Top Traffic Rankings Globally: टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या रिपोर्टनुसार, भारतातील ३ शहरांमध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी होत असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यात पुणे चौथ्या क्रमांकावर आहे.
Traffic
TrafficSaam Tv
Published On

ट्रॅफिक कोंडीचा त्रास आपल्याला अनेकदा होतो. या ट्रॅफिक कोंडीच्या त्रासाला वैतागून आपण अनेकदा रस्ते मार्गातून येण्यास टाळाटाळ करतो. पण ट्रॅफिक जामचा त्रास फक्त महाराष्ट्रात नसून, जगभरातील लोकांना होत आहे. पण तुम्हाला सर्वाधिक वाहतूक कोंडी कोणत्या शहरात होते, हे ठाऊक आहे का? टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या रिपोर्टनुसार, भारतातील ३ शहरांमध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी होत असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यात पुणे चौथ्या क्रमांकावर आहे.

डच लोकेशन टेक्नोलॉजी फर्म, टॉमटॉमच्या ट्रॅफिक इंडेक्स रिपोर्टनुसार, भारतातील ३ शहरांमध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी होते. यात आघाडीवर पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता असून, तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटकची राजधानी बंगळुरू आहे. कोलकाता आणि बंगळुरूमध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडीची नोंद झाली असून, चौथ्या क्रमांकावर पुणे शहर असल्याची माहिती आहे.

Traffic
ST Bus Accident: रत्नागिरीच्या शेनाळे घाटात भीषण अपघात, झाडामुळे एसटी बस धरणात पडता पडता वाचली; ७ प्रवासी जखमी

कोलकातामध्ये वाहनातून १० किलोमीटर अंतर कापण्यासाठी किमान ३४ मिनिटे ३३ सेकंद लागतात. तर बंगळुरूमध्ये वाहनातून १० किलोमीटर अंतर कापण्यासाठी ३४ मिनिटे १० सेकंद लागतात. तर चौथ्या क्रमांकावर पुणे शहर आहे. महाराष्ट्रातील पुण्यात वाहनातून १० किलोमीटर गाठण्यासाठी किमान ३३ मिनिटे २२ सेकंद लागतात. जागतीक क्रमावारीत वाहतूक कोंडीच्या बाबतीत कोलकाता दुसर्‍या, बंगळुरू तिसऱ्या आणि पुणे शहर चौथ्या क्रमांकावर आहे.

तर, हैदराबादमध्ये वाहनातून १० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किमान ३२ मिनिटे लागतात. तर चैन्नईत १० किलोमीटर कापण्यासाठी साधारण ३० मिनिटे लागतात. देशाची आर्थिक राजधानी अर्थात मुंबईत १० किलोमीटर अंतर गाठण्यासाठी २९ मिनिटे लागत असल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती टॉमटॉमच्या ट्रॅफिक इंडेक्स रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Traffic
Vasai railway station: धक्कादायक! मुंबई लोकलमध्ये विचित्र प्रकार, प्रवाशानं घेतला RPF जवानाचा चावा

जुने रस्ते, रस्त्यांचा घसरलेला दर्जा, वाहनांची वाढणारी संख्या अशा वेगवेगळ्या कारणांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याची माहिती आहे. रस्त्यांचे दर्जा सुधारणे, शहराचे योग्य प्रकरे नियोजन करणे, सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा वापर करण्यासाठी चालना देणे असे वेगवेगळे उपाय करून मंदावलेल्या वाहतुकीचा वेग वाढवणे शक्य असल्याचं वाहतूक तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com