maval, talegoan dabhade news, police, women, arrest saam tv
मुंबई/पुणे

Talegoan Dabhade : लग्नाचा तगादा लावल्यानं काढला तिचा काटा; प्रियकरासह चाैघे अटकेत

यातील तीन संशियतांना गुन्हे शाखेने तर सदानंद तुपकर याला तळेगाव पोलिसांनी अटक केली.

दिलीप कांबळे

Talegoan Dabhade News : तळेगाव दाभाडे येथील महिलेच्या खुनाची गुन्हे शाखेने उकल केली असून चार संशयित आरोपींना अटक केली आहे. संबंधित महिलेनं लग्नाचा तगादा लावल्याने तिचा सुपारी देऊन काटा काढण्यात आल्याचं पोलीस (police) तपासात उघड झाले आहे. बजरंग मुरलीधर तापडे, पांडुरंग बन्सी हारके, सचिन प्रभाकर थिगळे, सदानंद रामदास तुपकर अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

मावळ (maval) मधील तळेगाव येथे नऊ ऑगस्टला महिलेचा खून झाला होता. पोलिसांनी पंचनामा केला असता खून नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तळेगाव दाभाडे व आसपासच्या परिसरात तपास सुरु केला.

या तपासात बजरंग तापडे हा संबंधित महिलेला ओळखत असल्याचे समोर आले. त्याची अधिक चाैकशी केली असताना त्याने उडवा उडवीची उत्तर दिली. त्यानंतर त्यास पाेलिसी खाक्या दाखविताच त्याने काही गाेष्टी सांगितल्या. त्यानंतर पोलिसांनी तापडे याला अटक केली.

महिलेचे आणि तापडे याचे संबध हाेते. तिने लग्नासाठी तगादा लावला. मात्र, तापडे हा विवाहित असल्याने तसेच त्याला तीन मुले असल्याने त्याने लग्नाला नकार दिला होता. परंतु महिलेचा तगादा सुरुच राहिला. त्यामुळे तापडे तिचा काटा काढला असं पाेलिसांनी सांगितलं.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन लांडगे म्हणाले संबंधित महिला स्कूटीवरून घरी येत असताना संशयित आराेपी तिथे आले व त्यांनी स्कूटी अडवून महिलेस खाली उतरवून तिचे केस पकडून धारदार चाकूने गळा चिरून तिला ठार मारलं. त्यानंतर तेथून सर्वांनी पळ काढला. यातील तीन संशियतांना गुन्हे शाखेने तर सदानंद तुपकर याला तळेगाव पोलिसांनी अटक केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WTC Points Table: भारताच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; पाहा भारत कोणत्या स्थानावर?

Maharashtra Live News Update : विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकाची काठीने बेदम मारहाण

Eye Infection: पावसाळ्यात डोळ्यांना संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवा, जाणून घ्या महत्वाच्या सोप्या टिप्स

Ladki Bahin Yojana: वेळेवर ₹१५०० मिळत नाहीत, लाडकी बहीण योजना बंद करा, राज्यातील महिलांची मागणी

Mumbai Metro: घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे प्रचंड हाल; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT