Ganesh Chaturthi 2022 : यंदाच्या गणेश चतुर्थीला पूर्ण होतील प्रत्येक इच्छा, गणपतीला 'दहा' दिवस अर्पण करा या प्रिय वस्तू

गणपतीला प्रिय असणाऱ्या वस्तूंविषयी जाणून घ्या
Ganesh Chaturthi 2022
Ganesh Chaturthi 2022Saam Tv
Published On

Ganesh Chaturthi 2022 : भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अवघ्या काही दिवसात गणपतीचे आगमन प्रत्येक घराघरात आपल्याला पाहायला मिळेल.

सध्या सर्वत्र गणपतीच्या आगमनाची तयारी सुरु आहे. गणपतीला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी बाजारात सहज मिळताता. हा उत्सव अवघ्या १० दिवसांचा असतो. यांची सुरुवात पूजनाने होते व सांगता विसर्जनाने होते.

यंदा गणेश चतुर्थी ही ३१ ऑगस्टला येत आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर घरोघरी गणेशाची स्थापना केली जाते व मनोभावे त्याची पूजा केली जाते. या दिवशी गणेशोत्सवाला सुरुवात होते.

Ganesh Chaturthi 2022
Modak Recipe : फक्त तांदळापासून नाही तर, या पदार्थापासून बनवा उकडीचे टेस्टी मोदक !

खरेतर गणपतीला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते. अनेक संकटांना व दु:ख दूर करणारा आहे. या १० दिवसात आपण गणपतीची मनोभावे पूजा व अर्चना केल्यास तो प्रसन्न होऊन आपल्या घरात सुख व शांती येते. तसेच या दिवसांत आपण गणपतीला प्रिय असणाऱ्या पदार्थांचा भोग लावायला हवा.

श्रीगणेश (Ganesh) हा हिंदू धर्मातील पहिला पूज्य देव असल्याचे म्हटले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजेने केली जाते. जेणेकरून ती कामे सुरळीतपणे पूर्ण होतील. ज्या घरात गणेशाची कृपा दृष्टी होते, त्या घरात प्रत्येक कामात यश मिळते. लोक खूप प्रगती करतात. गणेशोत्सवात १० दिवस गणेशजींना त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तसेच बाप्पा सर्व संकटे दूर करतील.

या पदार्थांचा नैवेद्यात समावेश करा -

१. असे मानले जाते की गणेशजींना त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्यास ते लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे पहिल्या दिवशी त्यांना माव्याचे मोदक अर्पण करावेत.

Modak
ModakCanva

२. बाप्पालाही लाडू खूप आवडतात, म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांना मोतीचूर लाडू अर्पण करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या.

Ganesh Chaturthi 2022
Ganpati Decoration Ideas : कमी खर्चात सोप्या पध्दतीने बनवा, गणपतीचे सुंदर असे डेकोरेशन !

३. तिसर्‍या दिवशी गणेशजींना बेसनाचे लाडू अर्पण करायला विसरू नका.

ladu
laduCanva

४. गणेशाला केळी (Banana)अर्पण करणे उत्तम अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे चतुर्थीच्या दिवशी केळी अर्पण करा. तसेच आपण केळीपासून बनवलेले पदार्थ देखील ठेवू शकतो.

५. पाचव्या दिवशी आपण त्यांना मखान्याची खीर अर्पण करु शकतो.

६. सहाव्या दिवशी नारळ आणि सातव्या दिवशी सुक्या मेव्याचे लाडू बाप्पाला अर्पण करावेत. बाप्पाच्या आवडत्या वस्तू त्याला अर्पण करून, आपण लवकरच त्याला प्रसन्न करू शकता आणि त्याचे आशीर्वाद मिळवू शकता.

Kheer
KheerCanva

७. शास्त्रानुसार दुधापासून बनवलेला कलाकंदही गणपतीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आठव्या दिवशी तुम्ही त्यांना कलाकंद भोग म्हणून ठेवू शकतो. या गोष्टी घरी बनवून खायला दिल्यास बाप्पा तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील.

८. श्रीखंड गणेशजींनाही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपण त्यांना केशरापासून बनवलेले श्री खंडही भोगात अर्पण करू शकतो.

९. पूजेच्या शेवटच्या दिवशी अर्थात निरोपाच्या वेळी बाप्पाला त्याच्या आवडीचा उकडीचा मोदक अर्पण करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com