talegaon dabhade citizens demands to repair train of garden Saam Digital
मुंबई/पुणे

Maval: तळेगाव दाभाडे उद्यानातील खेळणी बनली धोकादायक, झुक झुक गाडीही बंद; बालचमूंचा हिरमाेड

childrens love to play in talegaon dabhade garden : उद्यानामधील फुलराणी गाडी तातडीने चालु करण्यात यावी अशी मागणी तळेगाव दाभाडे गावातील बालचमु करीत आहेत.

दिलीप कांबळे

मावळच्या तळेगाव दाभाडे शहरातील नगरपरिषदेच्या सरसेनापती उमाबाई दाभाडे उद्यानाची दुरावस्था झाली आहे. दाेन वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करून उद्यानाचे उदघाटन झाले. हे उद्यान लहान मुलांचे आकर्षक ठरले होते. परंतु येथील फुलराणी झुकझुक गाडी ऐन सुटीच्या काळात बंद असल्याने बालचमुंचा हिरमोड झाला आहे.

सध्या तळेगाव दाभाडे शहरातील आणि सभोवतालच्या परिसरातील ग्रामीण भागातील बालचमू पालकांसह झुकझुक गाडीत बसण्यासाठी मोठा आशेने येथे येतात. परंतु गाडी बंद असल्यामुळे त्यांची निराशा होत आहे.

या फुलराणी गाडीचा रेल्वे रुळ नादुरुस्त असल्याचं निर्दशनास आले आहे. रुळामधील लाकडी पट्टयाखराब झाल्या आहेत. काही कुजलेल्या आहेत. सध्या शाळेला उन्हाळी सुट्टया लागल्या असल्यामुळे परिसरातील मुले तेथे झुकझुक गाडीत बसण्यासाठी गर्दी करीत आहेत. परंतु गाडी बंद असल्यामुळे त्यांना गाडीत बसुन सफर मारायला मिळत नसल्यामुळे निराश होवून परत जावे लागत असल्यामुळे त्यांचा हिरमोड होत आहे.

या उद्याना मधील गवतास बरेच दिवसापासुन पाणी दिले नसल्यामुळे गवत ही सुकले आहे. या उद्यानातील झोके, घसरगुंडी आदी खेळण्याचे सहित्य खराब तसेच धोकादायक झाले आहे. लहानमुले त्यावर खेळतात यामुळे जिवीत हानी होण्याचीही शक्यता आहे. याबाबत प्रशासनाने दखल घ्यावी अशी पालकांची मागणी आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aishwarya Rai Speech: एकच धर्म आहे तो म्हणजे...पंतप्रधान मोदींसमोर ऐश्वर्या रायनं केलेल्या भाषणाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Schezwan Fried Rice: हॉटेलसारखा शेजवान फ्राइड राईस घरच्या घरी कसा बनवायचा?

बॉक्सिंग रिंगमधून उदय ते मोस्ट वॉन्टेड गुंड; 32 गंभीर गुन्हे अन्... बाबा सिद्दीकी प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई नेमका कोण? VIDEO

नाराजीनाट्यानंतर एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; शहाजी बापू पाटीलही भावुक, म्हणाले, एकटे पाडले?'

Amla Murabba Recipe : गुलाबी थंडीत 'असा' बनवा आवळ्याचा मुरंबा, आजीच्या हाताची अस्सल चव

SCROLL FOR NEXT