Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि तल्लख बुद्धीचे गुरुजी होते. त्यांच्या चाणक्य नितीत अनेक यशाची गुपिते दडवून ठेवलेली आहेत.
चाणक्यांच्या मते आयुष्यात जे लोक हुशारीने निर्णय घेतात त्यांचे नशीब त्यांची कधीच साथ सोडत नाही. अशी काही वैशिष्ट्ये स्वत: आत्मसाद करणे गरजेचे आहे.
हुशार व्यक्ती कधीच आपली खासगी माहिती सर्वांसमोर उघड करत नाही. आजचा मित्र उद्या शत्रू ठरू शकतो, याची त्याला जाणीव असते.
राग बुद्धी नष्ट करते. समजूतदार व्यक्ती रागात निर्णय न घेता शांत मनाने परिस्थितीचा विचार करतो.
''जो यशस्वी होतो तो जास्त ऐकतो आणि कमी बोलतो'' असे चाणक्य सांगतात. ही सवय योग्य निर्णय घेण्यास मदत करते.
बुद्धिमान व्यक्ती चुका, अनुभव आणि इतरांच्या सल्ल्यातून कायम शिकत राहतो. तो कधीच हार मानत नाही.
घाईघाईने घेतलेले निर्णय पश्चात्ताप देतात. हुशार लोक प्रत्येक निर्णयाचा परिणाम आधीच तपासतात.
बुद्धिमान व्यक्ती येणाऱ्या अडचणी आधीच ओळखतात आणि त्यासाठी तयारी करून ठेवतात.