Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे पालिकेचा कर वसुलीसाठी नवा फंडा, ढाेल वादनानंतर आता थकबाकीदारांच्या नावाचे फलक लावणार चौका चौकात

Talegaon Dabhade Palika : शंभर टक्के कर वसुल करून वीस कोटी रुपये नगरपरिषदेच्या कोषागारात जमा करण्याचा निश्चय मुख्याधिकारी के.एन.पाटील यांनी केला आहे.
talegaon dabhade nagarparishad to collect property tax from citizens
talegaon dabhade nagarparishad to collect property tax from citizenssaam tv

Talegaon Dabhade News :

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने मालमत्ताकराच्या वसुलीसाठी (property tax) थकबाकीदारांच्या घरा समोर ढोल वाजवायला सुरुवात केली आहे. वसूलीसाठीच्या या अनाेख्या पद्धतीमुळे थकबाकीदारांकडून आत्तापर्यंत लाखाे रुपयांचा थकीत कर जमा झाल्याची माहिती वसूली पथकाकडून मिळाली. (Maharashtra News)

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा नागरिकांनी माेठ्या प्रमाणात कर थकविला आहे. यामुळे तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन.के.पाटील यांनी मिळकतधारकांना नोटीसा दिल्या. त्यानंतरही नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. अखेर पालिकेने थकबाकीदारांच्या दारात जाऊन ढोल वाजवायला सुरुवात केली.

talegaon dabhade nagarparishad to collect property tax from citizens
Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवार गटास खिंडार? मावळमध्ये पदाधिका-यांचे राजीनामा सत्र, जाणून घ्या कारण

यामुळे नागरिकांनी थकीत कर भरण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या महिन्यात शंभर टक्के कर वसुल करून वीस कोटी रुपये नगरपरिषदेच्या कोषागारात जमा करण्याचा निश्चय मुख्याधिकारी यांनी केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यासाठी थकबाकीदारांचे नावाचे फलकही चौका चौकात लावण्याचा विचार पालिका करीत असल्याची माहिती तळेगाव नगरपरिषदचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

talegaon dabhade nagarparishad to collect property tax from citizens
Saam Impact : शाळेच्या व्हरांड्यात बसून धडे गिरवणा-या विद्यार्थ्याला शिक्षणाची कवाडे खूली, 'साम टीव्ही' मुळेच झाले शक्य आरे ग्रामस्थांची भावना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com