Pune Saam
मुंबई/पुणे

Pune crime: तोंडावर रूमाल अन् हातात कोयता, पुण्यातील कॅफेबाहेर तरूणांचा राडा, घटना CCTV मध्ये कैद

Pune Cafe Incident: पुण्यातील उच्चभ्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डी.पी. रस्त्यावर, २७ मे रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास, एका उशिरा सुरू असलेल्या कॅफेजवळ तीन तरुणांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवली.

Bhagyashree Kamble

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील उच्चभ्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डी.पी. रस्त्यावर, रात्री उशिरा सुरू असलेल्या एका कॅफेजवळ तीन तरुणांनी हातात कोयते आणि धारदार हत्यारे घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काही वाहनांची तोडफोडही केली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे.

मात्र, या घटनेला आता तीन दिवस उलटून गेले असतानाही संबंधित पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ही घटना २७ मे रोजी घडली. सीसीटीव्ही फुटेजनुसार, तीन तरुण एका दुचाकीवर आले होते. त्यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधले होते व हातात धारदार हत्यारे होती. ते थेट कॅफेमध्ये शिरले आणि अवघ्या दीड मिनिटात बाहेर येताच त्यांनी हत्यारे हवेत नाचवत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीवर हल्ला चढवला. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.

विशेष म्हणजे, या घटनेला तीन दिवस उलटून गेले असूनही संबंधित पोलिस ठाण्यात अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही, तसेच पोलिसांनीही कोणताही गुन्हा नोंदवलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. या घटनेमागील नेमकं कारण काय, कोणत्या वादातून ही कारवाई झाली, हे अद्याप अस्पष्ट आहे.

पुण्यात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार मागील काही काळात सातत्याने समोर येत असून, त्यातील अनेक तरुण अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांना कठोर कारवाई करण्यात अडचणी येत आहेत. या प्रकरणातील तरुण नेमके कोण आहेत आणि त्यांनी हे कृत्य का केले, याचा तपास अजूनही पोलिसांकडून सुरू झालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

Dahi handi : एक गाव-एक दहीहंडी! पण फोडण्याची हटके पद्धत, इथे विहिरीत उडी मारून फोडली जाते दहीहंडी; Video

Maharashtra Live News Update: इंदापूरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, 17 हुन अधिक नागरिकांचा घेतला चावा

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; पुण्यात घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीत शोककळा

Home Loan : होम लोन घेणाऱ्यांना जोरदार झटका! देशातील सर्वात मोठ्या बँकेनं वाढवले गृहकर्ज व्याजदर, EMI वाढणार

SCROLL FOR NEXT