Nashik News: अडवलं अन् पैसे देत नाही म्हणून तुडवलं; बाबांसोबत बाजाराला गेलेल्या तरूणावर टोकळ्याकडून चाकूने वार

Gang Attack in Nashik Panchvati: नाशिकच्या पंचवटी परिसरात बुधवारी संध्याकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत, वडिलांसोबत बाजारात भाजी खरेदीस गेलेल्या १९ वर्षीय युवकाचा चार जणांच्या टोळक्याने हत्या केली आहे.
nashik
nashikSaam
Published On

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका १९ वर्षीय युवकाला चार जणांच्या टोळक्याने मिळून मारहाण केली आहे. तसेच चाकूने वार करून त्याची हत्या केली आहे. या घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत सूरजला तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे.

ही घटना नाशिकच्या पंचवटी परिसरात बुधवारी संध्याकाळी घडली. नंदलाल उर्फ सूरज जगतदास (वय १९, रा. सीता गुंफा, पंचवटी) असे मृत युवकाचे नाव आहे. सुरज आपल्या वडिलांसोबत भाजी खरेदीसाठी बाजारात आला होता. वडील भाजी खरेदी करत असताना, सूरज पुलाखाली सुलभ शौचालयाजवळ उभा होता. त्या वेळी चार संशयित व्यक्ती त्याच्याजवळ आले आणि पैशांची मागणी केली.

nashik
Highway Video: हायवेवरच शरीरसंबंध ठेवणाऱ्या नेत्यासह त्या महिलेचे आणखी २ व्हिडिओ व्हायरल; रस्त्यावरच नग्नावस्थेत नाचत होते...

सूरजने पैसे देण्यास नकार दिल्यावर, एका संशयिताने त्याच्या डाव्या बाजूला पोटात चाकूने वार केला. तसेच इतरांनी त्याला मारहाण केली. नंतर आरोपींनी तेथून पलायन केले. गंभीर जखमी अवस्थेत सूरजला तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

nashik
Siddhant Shirsat: चेंबूरच्या फ्लॅटवर शरीरसंबंध, लग्न अन् गर्भपात; मंत्री शिरसाटांच्या मुलावर विवाहितेचे गंभीर आरोप

या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, ताब्यात घेतलेला संशयित अल्पवयीन आहे. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे असून, इतर संशयतिंचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com