Swargate Bus Depot Case Saam Tv
मुंबई/पुणे

Swargate St Bus Depot Case: माझ्या बदनामीला जबाबदार कोण? पीडित तरुणीचा पुणे पोलिसांना सवाल

Swargate Incident: स्वारगेट एसटी डेपोत तरुणीवर बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. पुणे पोलिसांनी पीडित तरुणीशी संवाद साधला यावेळी तिनेच पोलिसांना सवाल केले आहेत. माझ्या बदनामीला जबाबदार कोण? असा प्रश्न तिने पोलिसांना केला आहे.

Priya More

पुण्यातल्या स्वारगेट एसटी डेपोमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी अटक केल्यापासून त्याच्यासंदर्भात गुन्ह्यांबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा पुणे पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. अशामध्ये पीडीत तरुणीनी पोलिसांनाच माझ्या बदनामीला जबाबदार कोण? असा सवाल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट एसटी डेपो बलात्कार प्रकरणातील पीडितेकडून पोलिसांना विचारपूस करण्यात आली. माझ्या बदनामीला जबाबदार कोण? असा प्रश्न पीडित तरूणीने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना विचारला. पण या प्रश्नावर पोलिस अधिकारी निरूत्तर असल्याचे समोर आले. तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पीडित मुलीशी संवाद साधला होता. यावेळी पीडित तरुणीने हा प्रश्न विचारला.

दरम्यान, स्वारगेट एसटी डेपोमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणामध्ये पीडितेचे चारित्र्यहनन करणाऱ्या खोट्या, तसेच असंवेदनशील वक्तव्यांवर बंदी घालण्याची मागणी करणारी अॅड. असीम सरोदे यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ नुसार, जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना या संदर्भात आदेश काढण्याचे विशेष अधिकार राज्य सरकारने दिले आहेत, असे नमूद करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांनी हा अर्ज फेटाळला.

पीडितेच्या अधिकारांचे रक्षण करण्याचे आणि तिचे चारित्र्यहनन करणारी वक्तव्ये रोखण्यासाठी मनाई आदेश देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. त्यामुळे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे, असे पीडितेचे वकील अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT