Pune Crime : रस्त्यावरील अश्लील कृत्याबाबत दणका, गौरव-भाग्येशला एक दिवसाची पोलीस कोठडी; वकीलांचा जोरदार युक्तीवाद

Pune News : पुणे येरवडा येथे गौरव अहुजा याने केलेल्या अश्लील वर्तनाबाबत कोर्टात सुनावणी सुरु होती. गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश याला कोर्टाने १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Gaurav Ahuja and Bhagyesh Oswal remanded in police custody
Gaurav Ahuja and Bhagyesh Oswal remanded in police custodySaam TV News
Published On

पुणे : पुणे शहरातील येरवडा येथे मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मध्यभागी BMW कार उभी करून लघुशंका करून त्याने जाब विचारणाऱ्या एका व्यक्तीला अश्लील चाळे करणाऱ्या तरुणांना पुणे पोलिसांनी काल ताब्यात घेतलं आहे. भर रस्त्यावर कार उभी करून लघुशंका केल्याचा किळसवाणा प्रकार घडला, त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुणेकरांसह नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. आता पोलिसांनी गौरव अहुजाला ७ दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी केली होती. पण न्यायालयाने त्यांना केवळ एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आज दोन्ही आरोपींना कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. कोर्टात या दोन्ही तरूणांच्या वकीलांनी जोरदार युक्तीवाद केला.

सरकारी वकीलांचा युक्तीवाद

सार्वजनिक स्थळावर आरोपी बेशिस्तीने वागला आहे. महिला तिथे उपस्थितीत असताना त्याने सिग्नलवर लघुशंका केली आहे. यातील एकाच्या हातात दारूची बाटली देखील दिसत आहे. आरोपीनं कुठले अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का? याचा तपास करायचा आहे. जोरात गाडी आरोपीने चालवली आहे. दारू पिऊन आरोपीने गाडी चालवली असून सार्वजनिक ठिकाणी त्याने बेशिस्त वर्तवणूक केली आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी तो घटना घडल्यावर पळून गेला असल्याचे समजत आहे. सार्वजनिक ठिकाणावर आरोपीने ट्रॅफिक जॅम केलं होते. याचदरम्यान, आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती.

Gaurav Ahuja and Bhagyesh Oswal remanded in police custody
Raj Thackeray : राज ठाकरेंकडून पुन्हा लाव रे तो व्हिडिओ; सुषमा अंधारेंचा तो व्हिडिओ चालवत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

भाग्येश ओसवालच्या वकीलांचा युक्तीवाद

भाग्येश ओसवाल याचे वकील पुष्कर दुर्गे यांनी युक्तीवाद करताना म्हणाले, एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. एक व्यक्ती गाडीतून खाली उतरली, पण माझा अशिल गाडीत बसला होता. ओसवाल गाडीतून खाली उतरला नाही, ओसवाल गाडी सुद्धा चालवत नव्हता. भाग्येश ओसवाल स्वतः पोलिसात हजर झाला आहे. भाग्येश ओसवाल याचा या गुन्ह्याशी काय संबंध आहे? फक्त गाडीत शेजारी बसला म्हणून त्याच्यावर कलम लावला गेला. भाग्येश ओसवाल याचा जामीन अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

गौरव अहुजाच्या वकिलांचा युक्तीवाद

या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव आहुजाच्या वकिल सुरेंद्र आपुणे यांनी युक्तीवाद करताना म्हटलं की, नोटीस द्यायची नाही, मिडिया आणि राजकीय दबावाखाली या सगळ्या गोष्टी पोलिसांनी केल्या आहेत. सरळपणे सेक्शन ६५ लावलं गेलं. जो पर्यंत केमिकल रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत कलम ६५ लागू शकत नाही. पोलिसांनी असं कुठलंही द्रव्य जप्त केलं नाही. गाडी गुन्ह्यात वापरली नाही, जस्टीफिकेशन पोलिसांकडून दिसून येत नाही, आरोपी पळून गेलेला नाही, तो स्वतः कराड पोलिसांकडे हजर झाला आहे, असा युक्तीवाद गौरव आहुजा याच्या वकीलांनी केला.

Gaurav Ahuja and Bhagyesh Oswal remanded in police custody
Raj Thackeray: गंगेचं पाणी! हड मी नाही पिणार; राज ठाकरेंकडून कुंभस्नानाची खिल्ली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com