अभिनेत्री स्वरा भास्कर या देशातील विविध राजकीय घडामोडीवर परखड भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. स्वरा भास्कर यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करणाऱ्या अभिनेत्री स्वरा भास्कर या लवकरच राजकीय एन्ट्री करू शकतात. स्वरा यांना काँग्रेसकडून राज्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. स्वरा भास्कर यांच्या उमेदवारीच्या वृत्तावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Latest Marathi News)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वरा भास्कर लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असलयाचे बोललं जात आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वरा भास्कर यांच्या नावाचा विचार करण्यास सांगितलं आहे. स्वरा भास्कर यांच्याकडून अनेकदा केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली आहे.
महाराष्ट्रात सीएए विरोधातील अनेक सभांमध्ये स्वरा भास्कर यांनी हजेरी लावली आहे. या सभांना काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनीही हजेरी लावली आहे. स्वरा भास्कर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभाग नोंदवला होता.
स्वरा भास्कर यांचा पती फहद अहमद हे राजकीय युवा नेते आहेत. ते समाजवादी पक्षाच्या युवक सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत.
मुंबई मध्य-उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षांपासून भाजपचा खासदार आहे. संसदेत या मतदारसंघातून पुनम महाजन या नेतृत्व करतात. १० वर्षांआधी या मतदारसंघावर काँग्रेसचा दबदबा होता. २००४ मध्ये एकनाथ गायकवाड, २००९ मध्ये प्रिया दत्त यांनी लोकसभा निवडणूक जिंकली आहे.
महाराष्ट्रात लोकसभेचे एकूण ४८ लोकसभा मतदारसंघ आहेत. तर मुंबईत लोकसभेचे ६ मतदारसंघ आहेत. यापैकी भाजपकडे तीन, ठाकरे गटाकडे १ तर शिंदे गटाकडे २ खासदार आहेत.
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर स्वरा भास्कर यांचं नाव चर्चेत आलं आहे. तर महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटपावर अंतिम निर्णय झालेला नाही. या जागावाटपात काँग्रेसची भूमिका महत्वाची असणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.