Supriya Sule Saam Tv
मुंबई/पुणे

Supriya Sule On Kharghar Heat Stroke : खारघरच्या घटनेला जबाबदार कोण? सरकार उत्तर का देत नाही : सुप्रिया सुळे

Supriya Sule : खारघरच्या घटनेला जबाबदार कोण? सरकार उत्तर का देत नाही : सुप्रिया सुळे

Satish Kengar

Supriya Sule On Kharghar Heat Stroke : ''खारघरच्या घटनेला जबाबदार कोण? अजित पवारांनी सरकारला पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती, माझ्याकडे काही व्हिडीओही आले आहेत, पण सरकार उत्तर का देत नाही? त्यांनी उत्तर दिले पाहिजे'', असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

मुंबईमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता शिबिराचे आरोजन करण्यात आले आहे. यातच बोलताना त्या असं म्हणाल्या आहेत. त्या म्हणाल्या की, ''या घटनेमागील वस्तुस्थिती कोणी लपविण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे. ही बाब अतिशय गंभीर आहे.''  (Latest Marathi News)

आरे येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ''विकासाच्या नावाखाली आरे येथील वृक्षतोड विरोधात आवाज उठवला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस विकासाच्या विरोधात नाही, मात्र पर्यावरणाचा विचार केला पाहिजे. केंद्र सरकारने मुंबईच्या विकासाचे नवे मॉडेल आणावे.''

मुंबईमधील आपल्या आठवणी सांगताना त्या म्हणाल्या की, ''मुंबईने आपल्याला खूप दिले. एकदा मुंबईत राहिले की दुसरीकडे राहता येत नाही. मुंबईत लोक नेहमी घड्याळ बघतात. आता घड्याळवर बटन दाबले पाहिजे. आम्ही ७१ सली या वर्षांत मुंबईत आलो. ६७ शरद पवार साहेब आमदार झाले, लग्न झालं, मुल झाले. कुटुंब म्हणून आम्ही भाड्याच्या घरात मुंबईत सुरुवात झाली.''

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, ''शहराने शिक्षण दिले. मुंबईत नवरा भेटला. पोर इथे झाली. बीकेसी प्रस्ताव आला, तेव्हा पवार साहेब मुख्यमंत्री होते. आपली ताकद संघटना म्हणून मुंबईत वाढली पाहिजे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chalisgaon Crime : गृहकर्जाची बँकेतून काढली एक लाख ९० हजारांची रोकड; चोरट्यानी संधी साधत लांबविली रोकड

Maharashtra News Live Updates: ईव्हीएम विरोधात आंदोलन छेडणार; मातोश्रीतील बैठकीत ठाकरे गटाचा निर्धार

RCB Captain: RCB चा कॅप्टन ठरला! डू प्लेसिसनंतर या खेळाडूला मिळणार जबाबदारी

Raju Shetty : घोषणेप्रमाणे सर्व महिलांना लाभ मिळावा; लाडकी बहीण योजनेच्या नव्या निर्णयावरून राजू शेट्टी यांचा निशाणा

Manoj Jarange : फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी मी कुणाला भीत नाही; मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम

SCROLL FOR NEXT