इंपिरिकल डेटा संदर्भात केंद्र सरकारला बाजू मांडण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश Saam Tv News
मुंबई/पुणे

इंपिरिकल डेटा संदर्भात केंद्र सरकारला बाजू मांडण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

केंद्राने इंपिरिकल डेटा द्यावा यासाठी राज्य शासनाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई : ओबीसी वर्गाचे राजकीय आरक्षण (obc political reservation) पूर्ववत करण्यासाठी इंपिरिकल डेटा (Imperial Data) आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडे (Central Government) असलेली ओबीसींची सामाजिक व आर्थिक जनगणनेची माहिती राज्य शासनास (Maharashtra Government) उपलब्ध करून द्यावी यासाठी आज राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. (Supreme Court orders Central Government to side with Imperial Data)

हे देखील पहा -

या याचिकेवर आज सुनावणी पार पडली असून यात केंद्र सरकारला आपली बाजू मांडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल (kapil sibbal) यांनी बाजू मांडली.

कायदेशीर बाबींच्या पुर्ततेअभावी स्थगित झालेल्या ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकार चहू बाजूने प्रयत्न करत आहे. आरक्षण पूर्ववत करण्यासाठी अत्यंत गरजेचा असलेला इंपिरिकल डाटा हा केंद्राने द्यावा यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली त्यावर आज सुनावणी पार पडली. दि. २४ ऑगस्टला या याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे आहे. तोपर्यंत इंपिरिकल डाटा संदर्भात केंद्र सरकारला बाजू मांडण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

SCROLL FOR NEXT