वृत्तसंस्था
काबूल: अफगाणिस्तानमध्ये (Afganistan) तालिबानी (Taliban) क्रूरतेचे एक भयानक प्रकरण समोर आले आहे. येथे एका तरुणीची टाईट कपडे घालणाऱ्या तरुणीची हत्य़ा करण्यात आली. धक्कादायक म्हणजे तिच्यासोबत कोणताही पुरुष नातेवाईक नसल्याने तिची हत्या करण्यात आली आहे. अमेरिका (America) आणि ब्रिटनच्या (Britain) सैन्याने माघार घेतल्यानंतर कट्टरपंथी गटांकडून अत्याचाराच्या घटना शिगेला पोहचल्या आहेत. (Tightly dressed girls are being killed by the Taliban.)
महिलांनी पुरुषाशिवाय घराबाहेर पडू नये,
तालिबान्यांनी कब्जा केलेल्या ठिकाणी, महिलांना एकट्याने बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. महिलांनी नेहमी पुरुष नातेवाईकांसोबतच बाहेर जावे, असे फर्मान काढण्यात आले आहे. द सनच्या वृत्तानुसार, 3 ऑगस्ट रोजी तालिबानी अतिरेक्यांनी समर कांदियन गावात एका तरुणीची गोळ्या घालून हत्या केली, कारण तिने हा नियम मोडला. तसेच तिने घट्ट ड्रेस घातला होता.
पोलीस प्रवक्ते आदिल शाह आदिल यांनी सांगितले की, पीडितेचे नाव नाझनीन असून ती 21 वर्षांची होती. घरातून बाहेर पडल्यानंतर मुलीवर हल्ला करण्यात आला. त्यावेळी ती बाल्खची राजधानी मजार-ए-शरीफला जाण्यासाठी कारमध्ये बसणार इतक्यात तिची हत्या करण्यात आली. बाल्ख हा उत्तरेकडील युद्धग्रस्त प्रदेश आहे, येथील अनेक भागात तालिबानी अतिरेकी सक्रिय आहेत.
तालिबानने नकार दिला
तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी मुलीच्या हत्येचा आरोप फेटाळला आहे. मात्र, तालिबानचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. महिलांचे अपहरण करून त्यांच्याशी जबरदस्तीने लग्न केल्याच्या घटना येथे वाढत आहेत. त्याच वेळी, तालिबानच्या क्रूर नियमांचे पालन न केल्याबद्दल हत्या केल्या जात आहेत. या क्रूर दहशतवाद्यांनी आधीच डझनभर नागरिकांना ठार मारले आहे
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.