बेस्ट बसच्या प्रवासासाठी बसपास आणि दैनंदिन तिकीटामध्ये सुपर सेव्हर योजना... Saam Tv
मुंबई/पुणे

बेस्ट बसच्या प्रवासासाठी बसपास आणि दैनंदिन तिकीटामध्ये सुपर सेव्हर योजना...

या नव्या सुपर सेवर योजनेअंतर्गत बेस्ट उपक्रमाच्या नेटवर्कमध्ये कोणत्याही बस थांब्यापासून कोणत्याही बस थांब्यापर्यंत आणि उपलब्ध भाडे टप्प्यानुसार प्रवासी कुठेही प्रवास करू शकतात.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बेस्ट बसच्या (Best Bus) प्रवासाकरिता बसपास आणि दैनंदिन तिकीटामध्ये सुपर सेव्हर योजना (Super Saver Scheme) सुरु करण्याता येणार आहे. ७२ प्रकारच्या विविध नव्या योजनांमधून प्रवासी आपल्याला हवी असलेल्या फेरीची निवड करू शकतील. बस भाडे प्रति फेरी, तसेच भाडे टप्पा पद्धतीने, फेऱ्यांची संख्या आणि योजनेचा कालावधी यानुसार एक दिवसापासून 84 दिवसांपर्यंत आणि दोन फेऱ्यांपासून दीडशे फेऱ्यांपर्यंतचे विविध पर्याय प्रवाशांना उपलब्ध असतील, लवकरच ही योजना सुरू करण्यात येणार आहे. (Super saver plan in bus pass and daily ticket for best bus journey)

हे देखील पहा -

या नव्या सुपर सेवर योजनेअंतर्गत बेस्ट उपक्रमाच्या नेटवर्कमध्ये कोणत्याही बस थांब्यापासून कोणत्याही बस थांब्यापर्यंत आणि उपलब्ध भाडे टप्प्यानुसार प्रवासी कुठेही प्रवास करू शकतात. प्रवाशांना वातानुकूलित किंवा बिगर वातानुकूलित बस गाड्यांचा पर्याय देखील उपलब्ध आहे. प्रवास करताना सुरुवातीचा आणि शेवटचा बस थांबा निवडून त्यादरम्यान प्रवासी आपला प्रवास करू शकतात. प्रवास करण्यासाठी तिकीट किंवा बसपास यापैकी कोणत्याही पर्यायाची निवड प्रवासी करू शकतात. विद्यार्थ्यांकरिताचे आणि अमर्यादित अंतरासाठी बसपास देखील या नवीन सुपर सेव्हर योजने अंतर्गत कार्यरत राहतील.

सदर सुपर सेव्हर योजना बेस्ट उपक्रमाच्या डिजिटायझेशन प्रकल्पाचा एक भाग आहे आणि याची अंमलबजावणी 'चलो' या भारतातील अग्रगण्य अशा परिवहन तंत्रज्ञानाने युक्त व्यवसाय संस्थेच्या द्वारे करण्यात येणार आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रणालीच्या अनुषंगाने डिजिटल तिकीट सोल्यूशनकरिता सदर व्यवसाय संस्था सर्विस प्रोव्हायडर म्हणून बेस्ट उपक्रमाकरिता कार्यरत असेल. बेस्ट उपक्रमाच्या बस गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्याच्या दृष्टीने सदर योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे.

नवीन सुपर सेव्हर योजनेअंतर्गत प्रवाशांना त्यांच्या प्रवासाकरीता अधिकाधिक पर्याय, अधिक बचत आणि अधिक लवचिकता मिळेल. बेस्ट उपक्रमाद्वारे सदर योजना लवकरच बेस्ट मोबाईल अॅप आणि बेस्ट बस कार्डाच्या सहाय्याने प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येईल.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT