"या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार" - मनसे सोडलेल्या रुपाली पाटील यांच्याकडून पवारांची स्तुती...

रुपाली पाटील या मनसेच्या एक निष्ठावंत कार्यकर्त्या ओळखल्या जात होत्या. आता मात्र त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
"या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार" - मनसे सोडलेल्या रुपाली पाटील यांच्याकडून पवारांची स्तुती...
"या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार" - मनसे सोडलेल्या रुपाली पाटील यांच्याकडून पवारांची स्तुती...Saam Tv

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil-Thombare) यांनी पक्षातील सर्व पदांचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याकडे मनसेच्या (MNS) महिला प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. त्यामुळे ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुणे (Pune) शहरात मोठे खिंडार पडले आहे. रुपाली पाटील या मनसेच्या एक निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जात होत्या. आता मात्र त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या अधिकृतरीत्या त्यांचा पक्षप्रवेश झाला नसला तरी त्यांच्या आजच्या ट्विटवरुन ते राष्ट्रवादी मध्येच प्रवेश करणार हे स्पष्ट होतं. (Praise of Pawar from Rupali Patil who left MNS)

हे देखील पहा -

काय म्हणाल्या रुपाली पाटील?

रुपाली पाटील यांनी ट्विट करत शरद पवारांची (Sharad Pawar) स्तुती केली आहे, आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या की, "आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय’ दिसत नाहीत ; हो म्हणूनच ठरलंय ! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार ..." त्यांच्या या ट्विटमुळे त्या राष्ट्रवादी पक्षातच प्रवेश करणार यात काही शंका वाटत नाही.

का सोडला पक्ष?

मनसेला सोडचिठ्ठी देताना रुपाली पाटील म्हणाल्या की, मनसे मध्ये निस्वार्थी कार्यकर्ते आहे, त्यांनी मला भरभरून प्रेम दिले आहे. त्यांची ऋणी राहीन, बदल कोणात घडत नसेल तर मी माझा बदल केलेला आहे. 14 वर्ष मी काम केले आहे, मनधरणी अनेकांनी केली. नवीन पक्षात जाणार हे अद्याप मी ठरवलेले नाही, अनेकांच्या ऑफर(Offer) आलेल्या आहेत, निर्णय लवकरच जाहीर करणार आहे. राज ठाकरे माझे दैवत होते आणि आहेत. 14 वर्ष काम करत असताना मला तारेवरची कसरत करावी लागली.

माझ्यामुळे पक्षाला त्रास होणार असेल, तर मी माझा निर्णय घेतलेला बरा आहे. 14 वर्षात पक्षाने मला खूप काही दिले आहे. माझा वाद यावरुन नाही की मला काय दिले आणि काय दिले नाही माझ्या वैयक्तिक कारणासाठी मी राजीनामा दिला आहे. माझ्या काम करण्याच्या पद्धतीसह जे मला स्वीकारतील त्या पक्षात मी जाणार आहे. आता राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (Shiv Sena) समोर आहे. मला जर जायचं असतं तर 2019 ला मी निर्णय घेतला असता.

"या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार" - मनसे सोडलेल्या रुपाली पाटील यांच्याकडून पवारांची स्तुती...
भाजपवाले औकात नसताना आपली तुलना मोठ्या लोकांशी करतात; बच्चू कडूंचा घणाघात

माझ्यावर ही वेळ का आली याची कल्पना तुम्हालाही माहिती आहे. त्याबद्दल मला काहीही बोलायचे नाही. भाजपची अद्याप ऑफर नाही. मी बेधडक होते आणि आहे. पक्ष सोडण्याच्या भावना इमोशनल आहेत. रिकामटेकड्या नेत्यांमुळे रुपाली पाटीलवर ही वेळ आली त्यांना योग्य वेळी उत्तर देईल असंही रुपाली पाटील म्हणाल्या होत्या.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com