पहाटेच्या शपथविधीवरुन मुनगंटीवारांचे मलिकांना चिमटे; 'ती चूक अजित दादांकडून' Saam TV
मुंबई/पुणे

पहाटेच्या शपथविधीवरुन मुनगंटीवारांचे मलिकांना चिमटे; 'ती चूक अजित दादांकडून'

काल विधानसभेत एक किस्सा घडला तो म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पाठीच्या मणक्याचे ऑपरेशन झाले आहे.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

मुंबई : मुंबईत महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होते, त्याचबरोबर काही किस्से ही घडतात. काल मुख्यमंत्र्यांच्या बाबतीतला किस्सा विधानसभेत घडला होता. आज झालं असं की पुन्हा पहाटेचा शपथविधी घेतल्याचा मुद्दा सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थाीत करत नवाब मलिकांना (Nawab Malik) चिमटे काढले. अल्पसंख्यक मंत्र्यांना आरक्षण देता आलं असतं तर त्यांनी रात्रीच‌ फाईल काढली असती या सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर नवाब मलिक खाली बसून म्हणाले मी रात्रीचे उद्योग करत नाही. त्यावर मुनगंटीवार म्हणाले तुम्ही अजित पवारांबद्दल (Ajit Pawar) बोलतात का, अजित‌ पवारांचे विरोधक आहे‌ का, झाली एकदा अजित दादांकडून चूक. पहाटेच्या शपथविधीवरुन भाजपच्या (BJP) मुनगंटीवार यांनी नवाब मलिक यांना चिमटे काढले आहे.

दरम्यान काल विधानसभेत एक किस्सा घडला तो म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पाठीच्या मणक्याचे ऑपरेशन झाले आहे. त्यानंतर त्यांना बसण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विधानसभेत मुख्यमंत्री बसतात तिथे चार इंच बसण्यासाठी कुशन ठेवण्यात आले आहे. विधिमंडळात मुख्यमंत्री कार्यलयात ही अश्या पद्धतीने व्यवस्था करण्यात आली आहे. एवढं करुनही काल अधिवेशनात मुख्यमंत्री आज उपस्थित नव्हते. आज मुख्यमंत्री येणार का याकडे लक्ष विरोधकांसह सर्वांचे लक्ष लागून आहे. परंतु आजही मुख्यमंत्री अनुपस्थीत राहिले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT