Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

सत्तेत न आल्यामुळं विरोधकांच्या स्पीकरमधून अशी वक्तव्य- संजय राऊतांचा टोला

राऊतांची भाजपच्या नेत्यांवर टीका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आमच्या हातात हिंदुत्त्वाची गदा योग्य वेळी फिरणार आहे, आणि ज्यांच्या डोक्यावर आपटायची आहे, त्यांच्या डोक्यावर जाऊन आपटणार आहे, असे म्हणत संजय राऊतांनी हल्लाबोल सुरु केला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या राज्यात जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, अशी टीका देखील संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. जे अस्वस्थ नेते आहेत, अशांत नेते आहेत, त्यांनी आपल्या घरी हनुमान चालिसाचे (Hanuman Chalisa) पठण करावे, त्यांच्या मनाला शांती मिळणार आहे, असा देखील खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

हे देखील पाहा-

याबरोबरच किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्याप्रकरणी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) ओठांच्या खाली सॉस लावून जखमी झाल्याचा दावा करत टोला संजय राऊतांनी लगावला आहे. शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत म्हणाले की, देशात कोणत्या प्रकारचे वातावरण आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ज्या पद्धतीने वापर केला जात आहे, न्यायालयांवर दबाव आणला जात आहे, विरोधी पक्ष अनेक राज्यांमध्ये कशाप्रकारे दहशत घोकत आहे. याविषयी, मानवी हक्कांसंदर्भात जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली आहे. यामुळे ते कोणत्या हिटलशाही विषयी बोलत आहेत हे समजून घ्यावे लागणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना लोकशाही जास्त चिंता आहे तर त्यासंदर्भामध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा करु आणि त्यांनी भूमिका मांडली आहे. ती फक्त महाराष्ट्रापुरती नसून, राष्ट्रीय स्तरावर देखील असू शकणार आहे. कारण संपूर्ण देशात हुकुमशाही निर्माण झाली आहे का? अशी चिंता सर्वांनी व्यक्त केली आहे. त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला असणार आहे. आम्ही त्यांच्याशी बोलू... महाराष्ट्रात जे उद्धव ठाकरे, शरद पवारांना ओळखतात, त्यांना इतके लोकशाहीवादी सरकार संपूर्ण देशात नाही हे कळले आहे. विरोधकावंर हल्ले म्हणजे काय? कोणी एखादा माथेफिरु, वेडा स्वत:वर हल्ला झाला म्हणून, ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असणार आहे आणि राष्ट्रपती राजवट लावा सांगत असेल तर अशा मूर्खपणाकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असे संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये मागील ३ महिन्यात १७ खून आणि बलात्कार झाले आहेत. हिटलरशाही, हुकूमशाही, कायदा सुव्यवस्था कोसळणे काय आहे हे आपण बघितलं पाहिजे. आसाम सरकारने गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांना नरेंद्र मोदींविषयी ट्वीट केल्याप्रकरणी अटक करुन सुटका झाल्यानंतर पुन्हा अटक करण्यात आले आहे. हे नेमके कोणत्या लोकशाहीचे लक्षण आहे? यावर देखील फडणवीसांनी मनमोकळे केले पाहिजे. कारण त्यांना ही लोकशाहीची उबळ आली आहे. ती राष्ट्राच्या हिताची आहे, असं संजय राऊत यावेळी म्हणाले. भाजपची भूमिका लोकशाहीवादी आहे. भाजपचे नेते महाराष्ट्रात ज्यांचे नेतृत्त्व नरेंद्र मोदी करत आहेत, अशा पक्षाचे लोक लोकशाही विषयी प्रवचने सोडत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. मला देवेंद्र फडणवीसांचे कौतुक देखील आहे. कालच शरद पवारांनी चांगले वक्तव्य केले आहे. सरकार पुन्हा सत्तेत येऊ शकले नाही, येण्याची प्रबळ इच्छा होती, उबळही होती, तरी सत्तेत येऊ शकले नाही. यामुळे जी अस्वस्थता आहे, त्यामधून विरोधी पक्षाच्या लाऊडस्पीकरमधून वक्तव्यं बाहेर पडत आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Maharashtra Live News Update: माधवी खंडाळकर अजित पवारांच्या भेटीला

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

Accident News : स्कूल बसचा भीषण अपघात, झाडाला धडक दिल्यानंतर...; २२ विद्यार्थी जखमी

Indurikar Maharaj Age: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज याचं वय किती? माहितीये का?

SCROLL FOR NEXT