Success Story Saam Tv
मुंबई/पुणे

Success Story: सातवी पास, पुण्यातील ७० वर्षीय आजींचा वडापावचा व्यवसाय; जमीन अन् तीन मजली घर केले खरेदी

Succcess Story of Pune Aaji Vadapav Stall: पुण्यातील ७० वर्षीय आजीने स्वतः चा व्यवसाय सुरु केला आहे. या आजी वडापावचा धंदा करतात. या माध्यमातून त्यांनी घर आणि जमीन खरेदी केले आहे.

Siddhi Hande

पुण्यात आजीबाईंचा वडापावचा व्यवसाय

७० वर्षीय आजी कमावतात हजारो रुपये

घर अन् जमीन केली खरेदी

व्यवसाय करण्यासाठी खप मेहनत आणि चिकाटी लागते. कोणताही बिझनेस जर तुम्ही १००० दिवस सुरु ठेवला तर त्याला कधीच अपयश येत नाही, असं म्हणतात. मग तो व्यवसाय वडापावचा असो किंवा एखादी मोठी कंपनी. तुमच्या कामात नेहमी सातत्य असायला हवे. असंच काहीसं एका आजीबाईंनी केलं आहे. एका ७० वर्षांच्या आजीबाईंनी वडापावच्या व्यवसायावर जमीन अन् घर खरेदी केले आहे.

पुण्यातील आजीबाईंचा व्यवसाय (Pune Aajibai Success Story)

पुण्यातील ताराबाई ज्ञानेश्वर ढोणे या आजीबाईंनी आपला स्वतः चा व्यवसाय सुरु केला. त्यांनी पुण्यात वडापाव विकायला सुरुवात केली. त्यांनी १९८८ पासून व्यवसायाला सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला शेंगा विकायची गाडी सुरु केली होती. त्यानंतर वेगवेगळे पदार्थ तयार केले.

या आजीबाईंचे शिक्षण सातवी पास झाले आहे. त्या सुरुवातीला येवल्यातील खेड्यात राहत होते. त्यानंतर त्या पुण्यात आल्या. ७० वर्षांच्या असूनही त्या आज काम करत आहेत.

मुलांसाठी वडापावचा छंदा

आजीची मुले मोठी झाल्यानंतर त्यांनी वडापावचा धंदा सुरु केला. २०-२५ वर्षांपूर्वी सुरु केलेला हा धंदा आजही उत्तम सुरु आहे. सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेआठपर्यंत ही वडापावची गाडी सुरु असते. या स्टॉलवर वडापावसोब भजी, दालवडा असे अनेक पदार्थ विकले जातात. दिवसभरात शेकडो वडापाव विकले जातात. या वडापावच्या माध्यमातून त्यांनी एक एकर जागा अन् तीन मजली घर बांधलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मीरा-भाईंदरमधील काशिमीरा परिसरात मध्यरात्री तरुणांचा दारू पिऊन धिंगाणा

वाघाचा बाईकस्वारावर हल्ला? शेपटीवरून बाईक नेणं पडलं महागात?

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! कधीपासून लागू होणार आठवा वेतन आयोग? सरकारनं दिली नेमकी माहिती

महाराष्ट्राला विरोधी पक्षनेताच नाही, विरोधी पक्षनेतेपदाविनाच चालणार अधिवेशन?

फुगा फुटला, जीव गेला, मुलांच्या हातात फुगा बॉम्ब

SCROLL FOR NEXT