Maharashtra Political News  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Political News : आदित्य ठाकरेंच्या टीकेला भूषण देसाईंचा पलटवार; म्हणाले, मी लहान...'

आदित्य ठाकरे यांच्या टीकेला भूषण देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. '

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ठाकरे गटाचे जेष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांच्या शिवसेना प्रवेशावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. आदित्य ठाकरे यांच्या टीकेला भूषण देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'मी लहान आहे. त्यांना तसंच वाटणार, असं म्हणत भूषण देसाई यांनी पलटवार केला आहे. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. भूषण देसाई यांनी बाळासाहेब भवनमध्ये हा पक्षप्रवेश झाला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भूषण देसाई यांचे स्वागत केले.

भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भूषण देसाई म्हणाले, 'बाळासाहेब ठाकरे हेच माझं दैवत आहे. शिवसेना या दोन शब्दांना सोडून माझ्यासमोर तिसरं काही आलं नाही. आठवतही नाही. या राज्यासाठी साहेबांनी स्वप्न बघितलं होतं, ते आज कोण पुढे घेऊन जात असेल, विकास आणि साहेबांचे विचार ते शिवसेना-भाजप युतीचे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत'.

'आम्ही आधीपासूनच एकत्र काम केलं आहे. त्यांना जवळून बघितलं आहे. त्यामुळे मी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी लहान कार्यकर्ता म्हणून काम करतोय. शिंदेंच्या कामामुळे मी प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असंही देसाई यांनी म्हटलं.

'माझा शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या कामाचा वेग, निर्यण, क्षमता मी जवळून अनुभवली आहे, अशी प्रतिक्रिया भूषण देसाई यांनी दिली आहे. त्यांचा स्वभाव, काम करण्याची पद्धत आवडल्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मी हा निर्णय खूप आधी घेतला होता. हे नवं सरकार स्थापन झालं तेव्हाच मी हा निर्णय घेतला होता, असंही भूषण देसाई यांनी पुढे म्हटलं.

दरम्यान, वॉशिंग मशीनमध्ये ज्यांना जायचे आहेत, ते जाऊ शकतात, आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना भूषण देसाई म्हणाले, 'मी लहान आहे, त्यांना तसंच वाटणार आहे'.

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?

भूषण देसाई यांच्या शिवसेना प्रवेशावर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले होते की, 'वॉशिंग मशीनमध्ये ज्यांना जायचे आहेत, ते जाऊ शकतात. सुभाष देसाई आज देखील शिवसेनेत आहेत. जेव्हा ४० गद्दार पाठीत खंजीर खूपसत जातात, तो धक्का होता. पण आम्ही उभे राहिलो. अंगावर वार होत आहेत, तरी देखील आम्ही उभे आहोत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; ४७४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द, महाराष्ट्रातील ४४ पक्षांचा समावेश

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊनही गोपीचंद पडळकर वक्तव्यावर ठाम, म्हणाले - 'माफी मागायचा विषयच नाही'

Maharashtra Live News Update: राजापूर येथे बस थांबवून विद्यार्थांचं आंदोलन

Ajit Pawar: दोन्ही बंधू एकत्र आले तर....; उद्धव आणि राज ठाकरेंवर अजित पवारांचं मोठं विधान

डॉक्टरच्या बायकोला जाळ्यात अडकवलं; प्रायव्हेट व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, लाखो पैसे लुबाडले, अखेर..

SCROLL FOR NEXT