Mumbai News: दुचाकीस्वारांनी माझा पाठलाग केला; शीतल म्हात्रेंची थेट मुंबईत पोलिसांत तक्रार

Sheetal Mhatre complained to police: शिवाजी पार्क येथून बाळासाहेब भवन येथे जात असताना दोन तरुणांनी माझा पाठलाग केला असा संशय व्यक्त करत त्यांनी तक्रार नोंदवली आहे.
Sheetal Mhatre complained to police
Sheetal Mhatre complained to policesaam tv
Published On

>> Sachin Gaad

Sheetal Mhatre News: शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. शिवाजी पार्क येथून बाळासाहेब भवन येथे जात असताना दोन तरुणांनी माझा पाठलाग केला असा संशय व्यक्त करत त्यांनी तक्रार नोंदवली आहे. शितल म्हात्रे यांनी सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे.

याबाबात बोलताना शितल म्हात्रे यांनी सांगितले की, 'मी शिवाजी पार्क येथून मंत्रालयासमोर असलेल्या बाळासाहेब भवन या आमच्या पक्षाचे कार्यालयाकडे जात होते. सिद्धिविनायक मंदिर परिसरातून जात असताना दुचाकीवर बसलेले दोन माझ्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करत होते. ते माझ्या गाडीजवळ येऊन उभे राहण्याचा प्रयत्न करत होते आणि माझ्याकडे पाहून बोट दाखवत इशारे करत होते'.

Sheetal Mhatre complained to police
Political News : ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार? सुभाष देसाईंचे पुत्र शिवसेनेत प्रवेश करणार, सूत्रांची माहिती

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, 'माझ्या गाडीच्या बाजूला येण्याचा ते प्रयत्न करत होते. परंतु माझ्या सुरक्षेत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला पाहून ते घाबरले आणि थोडे मागे झाले. मला वाटते की असे प्रसंग पोलिसांना सांगितले पाहिजे आणि त्यासाठी मी आज सह पोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांना भेटले. त्यांना पत्र देऊन घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली आहे. पुढे पुन्हा अशी काही घटना घडू नये यासाठी मी त्यांना पत्र दिले आहे'. (Latest Marathi News)

तुम्हाला कोणावर संशय आहे का असे विचारल्यानंतर शितल म्हात्रे म्हणाल्या, आता कोणावर संशय घेण्याची गरज नाही. ज्यांच्यावर संशय होता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आम्ही जे म्हणत होतो की ठाकरे गटाचाच यात हात आहे ते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असेही त्या म्हणाल्या.

Sheetal Mhatre complained to police
MNS News : मोठी बातमी! मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा पुन्हा तापणार; मनसे आक्रमक, गुढीपाडव्याला राज ठाकरे काय बोलणार?

व्हायरल व्हिडिओची एसआयटी चौकशी होणार

दरम्यान दोन दिवसांपूर्वी शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा आक्षेपार्ह मार्फ केलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली देखील केली आहे. ठाकरे गटाच्या अधिकृत पेजवरून हा व्हिडिओ व्हायरल झाला असा आरोप शितल म्हात्रे यांनी केला होता. त्यानंतर आथा या प्रकरणाचा तपास 'एसआयटी'च्या माध्यामातून होणार आहे. सोमवारी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन केल्याची घोषणा केली आहे. (Latest Political News)

तसेच ठाकरे गटाच्या सोशल मीडियाचा राज्य समन्वयक विनायक डावरे याने हा व्हिडिओ मातोश्री या फेसबूक पेजवर अपलोड केला आणि इतर आरोपींनी जाणीवपूर्व काही व्हॉटस्अॅप ग्रुपवर व्हायरल केल्याचे समोर आले असे देखील शंभूराज देसाई यांनी सांगितले. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com