Pune College News Saam Tv
मुंबई/पुणे

Education Justice : पुण्यात नामांकित कॉलेजने कागद पडताळणीसाठी केला उशीर, तरुणाची ब्रिटनमधली नोकरी गेली, नेमकं काय आहे प्रकरण?

Pune College News : पुण्यातील नामांकित कॉलेजवर विद्यार्थ्याने भेदभावाचा गंभीर आरोप केला आहे. कागदपत्र पडताळणीस उशीर झाल्याने विद्यार्थ्याची ब्रिटनमधील नोकरी गमावल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र कॉलेजने आरोप फेटाळला आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यातील मॉडर्न कॉलेजने पडताळणीला टाळाटाळ केली.

  • ब्रिटनमधील नोकरीची संधी गमावल्याची खंत विद्यार्थ्याने व्यक्त केली आहे

  • कॉलेजने म्हटलं आहे की प्रमाणपत्र दिलं असून विद्यार्थ्याचे आरोप खोटे

  • प्रकरणावर रिपब्लिकन पार्टीचा हस्तक्षेप

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

पुण्यातील मॉडर्न कॉलेजने आपल्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने आपल्याला ब्रिटनमधील कंपनीतील नोकरी गमवावी लागली आहे,’ असा दावा प्रेम बिऱ्हाडे या तरुणाने केला होता आणि सोशल मीडियावर एक व्हिडिओ करत हे प्रकरण काय आहे याची स्वतः माहिती दिली.

प्रेम ने प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये प्रेमने २०२०-२४ या कालावधीत बीबीएचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयाच्या प्रशासनाने जातीय भेदभाव करून व्हेरिफिकेशन केले नाही,’ असा आरोप त्याने केला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी ब्रिटनमधील कंपनीने ई-मेलद्वारे कॉलेजला विचारणा केली. मात्र, कॉलेजने पडताळणीला टाळाटाळ केल्याने, स्वत: प्रेमने विभागप्रमुख, उपप्राचार्य आणि प्राचार्यांशी संपर्क साधून पडताळणी करून, प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा केला. मात्र, प्राध्यापकांनी आपल्याला जातीबाबत माहिती विचारून, वरिष्ठांच्या आदेशावरून प्रमाणपत्र देता येणार नाही, असे सांगितल्याचा दावा प्रेमने केला आहे.

दरम्यान, आता कॉलेजने या प्रकरणावरून सर्व आरोप फेटाळले असून, विद्यार्थ्याला प्रमाणपत्र उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. कॉलेजने १४ ऑक्टोबरला प्रमाणपत्र दिल्याचे जाहीर केले. प्रेम हा महाविद्यालयाच्या बदनामीसाठी सोशल मीडियाचा वापर करीत आहे. त्यांची कृती बदनामी, सायबर छळ आणि समाजाला भडकावणे या अंतर्गत येतात.

संबंधित विद्यार्थ्याबाबत पोलिसांनी कायदेशीर कारवाई केल्यास, प्राध्यापक वर्गाचा छळ आणि महाविद्यालयाची बदनामी थांबेल,’ असे स्पष्टीकरण प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे यांनी दिले. आता दुसऱ्या बाजूला, याच प्रकरणी रिपलब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी याप्रकरणी प्रेम शी बातचीत केली तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे कुलगुरू यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं.

प्रेम ने व्हिडिओमध्ये काय म्हटले आहे ?

प्रेम म्हणाला, "जय भीम सगळ्यांना. मी आता माझ्या काम करत असलेल्या कंपनीच्या बाहेर उभा आहे. माझ्या हातात आयडी कार्ड आहे. ते मी आता कंपनीत परत करायला जात आहे. कारण माझी नोकरी गेली आहे. ती पण पुण्याच्या कॉलेजमुळे. या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं मी त्यांचा विद्यार्थी होतो का ? तेव्हा त्या कॉलेजने सांगितलं नाही. त्याच कॉलेजने माझ्या युनिव्हर्सिटीच्या अँप्लिकेशनच्या टाईमला दोन लेटरवर रेकमेंटेशन दिली होते. मात्र या वेळेस त्यांनी का नाही सांगितलं ? कारण त्यांना आम्ही पुढे गेलेलो नको आहे. हे फक्त आयडी कार्ड किंवा नोकरी नाही. हे माझं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या शिक्षकांचं तसेच माझ्या समाजाचा अनेक वर्षांचा संघर्ष होता."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

Accident News : हृदयद्रावक! दिवाळीला मामाच्या गावी जाताना काळाचा घाला; थारच्या धडकेत दोन मुलांसह आई-वडिलांचाही मृत्यू

यशस्वी जैस्वाल, हर्षित राणा OUT; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल भारताची Playing XI

SCROLL FOR NEXT