crime news , lonavala, pune, student , hospital , injured , parents , youth saam tv
मुंबई/पुणे

Lonavala Crime News : लोणावळ्यात विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; कुटुंबाचा 'त्या' युवकांवर संशय

पाेलीस या घटनेचा कसून तपास करीत आहेत.

दिलीप कांबळे

Lonavala Crime News : लोणावळा येथील कुरवंडे रोडवर ट्युशन वरून घरी जाणार्‍या एका शालेय विद्यार्थ्यांवर (student) अज्ञात व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला आहे. डोक्यात काहीतरी ठणक वस्तू मारल्याने संबंधित विद्यार्थी रक्ताच्या थारोळ्यात पडला. हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस (police) ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयुर तानाजी फाटक (वय पंधरा, राहणार कुरवंडे, लोणावळा) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार तीन महिन्यापुर्वी तानाजी फाटक यांच्या मुलास काही युवक विनाकारण त्रास देत होते. याबाबत त्यांनी युवकांना भेटून समजविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी फाटक यांना मारण्याची धमकी दिली होती.

तसेच तुमची मुले या रस्त्याला भेटली तर आम्ही त्यांना दाखवतो असे धमकावले होते. त्यानंतर मंगळवारी मयुर हा सायंकाळी ट्युशन वरून घरी येत असताना रात्रीच्या अंधारात ही घटना घडली आहे. जखमी मयूरवर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी फाटक यांनी दोन युवकांची संशयित म्हणून नावे दिली असून लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो असे सांगत भोंदू बाबाकडून 1 कोटी 87 लाखाची फसवणूक

CM फडणवीसांनी काल 'आदेश' दिला; आज पोलिसांनी भाजप नेत्यालाच उचललं!

Shocking : बंद फ्लॅटमधून दुर्गंधी, दरवाजा तोडला, आतील दृश्य बघून सगळेच हादरले; आई आणि ४ मुलं निपचित पडली होती...

Maharashtra Politics: ते पाकिस्तानलाही सोबत घेतील; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका|VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा,ऑक्टोबरचे ₹१५०० कधी येणार?

SCROLL FOR NEXT