Crime Saam Tv News
मुंबई/पुणे

Police Exam Cheating: पोलीस होण्यासाठी निघाला, पण एका चुकीने तुरुंगात गेला; मुंबई पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

Exam malpractice in Mumbai: कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षेसाठी कानात ब्लूटूथ घालून आलेल्या तरूणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्या कानात ब्लूटूथ आढळून आल्याने त्याला रंगेहाथ पकडलं.

Bhagyashree Kamble

संजय गडदे, साम प्रतिनिधी

मुंबई पोलीस दलातील चालक, कारागृह अशा विविध पदांसाठी, मुंबईतील अनेक केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. राज्यभरातून परिक्षेसाठी हजारो विद्यार्थी आले होते. मात्र, बोरिवली पूर्वेकडील कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका परीक्षा केंद्रावर कॉपीचा प्रकार उघडकीस आला. विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी कानात ब्लूटूथ घालून आला होता. मात्र, त्याच्या संशयास्पद हालचाली पाहून त्याची झडती घेतली असता, त्याच्या कानात ब्लूटूथ आढळले. मोहम्मद शेख असं या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे नाव असून, त्याला रंगेहाथ पकडत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मागील दोन दिवसांपासून मुंबई पोलीस दलातील विविध पदांसाठी लेखी परीक्षा सुरू आहेत. कारागृह आणि चालक या पदांसाठी मुंबईत परीक्षा पार पडली. या परीक्षेवेळी ओशिवरा येथील रायगड मिलिटरी स्कूल या परीक्षा केंद्रावर कॉपी करण्यापूर्वीच विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आलंय. सकाळी परीक्षा केंद्रावर सर्वच विद्यार्थी दाखल झाले असता, मोहम्मद शेख हा देखील परीक्षा केंद्रात शिरला. मात्र, त्याची संशयास्पद हालचाल तेथील पर्यवेक्षकांनी टिपली.

विद्यार्थ्याच्या संशयास्पद हालचाली पाहून, पर्यवेक्षकांनी प्रश्नपत्रिका आण उत्तरपत्रिका देण्यापूर्वी त्याची झडती घेतली. तपासणी केली असता, त्याच्या कानामध्ये मोबाईलला कनेक्ट असलेले एक ब्लूटूथ डिवाइस आढळून आले. ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर पर्यवेक्षकाने त्याला परीक्षेसाठी बसण्यास मनाई केली, आणि कस्तुरबा मार्क पोलिसांच्या ताब्यात दिले.

मोहम्मद शेख या तरुणाची आरोग्य तपासणी केल्यानंतर, त्याच्यावर कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध फसवणूक तसेच महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ परीक्षांमध्ये होणार्‍या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियम १९८२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्याने हे ब्लूटूथ डिवाइस नेमकं कुणाकडून आणले? त्याच्या सोबत आणखीन कुणाचा सहभाग आहे का? यासंदर्भात कस्तुरबा मार्क पोलीस अधिकचा तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT