File Photo  Saam Marathi
मुंबई/पुणे

Pune : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिंकारा हरणाचा मृत्यू ; आठवड्यातील दुसरी घटना

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन वर्षाच्या चिंकारा हरणाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे.

मंगेश कचरे

पुणे : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन वर्षाच्या चिंकारा हरणाचा (Deer) दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. एकाच आठवड्यात दोन चिंकारा हरणाचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने प्राणी मित्रांमध्ये संतापाची लाट आहे. वन्य प्राण्यांवर जीवघेणे हल्ले सातत्याने भटक्या कुत्र्यांकडून (Stray Dog) होत असल्याने प्राणी मित्रांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे त्यांचा प्रश्न पुण्यात पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी प्राणी मित्रांकडून करण्यात येत आहे. ( Stray Dog Attack on chinkara deer In Pune )

शनिवारी दुपारी इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी हद्दीतील सोनमाथ्याजवळ रामदास भोंग शेतात गेले होते. त्यावेळी त्यांनी चार-पाच भटक्या कुत्र्यांनी चिंकारा हरणाला जखमी केल्याचे पाहिले. त्याची माहिती भोंग यांनी तातडीने फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबच्या सदस्यांना दिली. फ्रेंड्स ऑफ नेचर क्लब व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

फ्रेंड्स ऑफ नेचर क्लब व वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, त्यावेळी हरणाला भटक्या कुत्र्यांनी बऱ्याच ठिकाणी चावा घेऊन जखमी केले होते. जखमी झाल्याने हरिण मृत्यूमुखी पडले. दरम्यान, रविवारी १२ जून रोजी याच परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिंकारा ठार झाला होता. भटक्या कु्त्र्यांकडून प्राण्यांवर होणाऱ्या हल्ले वाढल्याने प्राणी मित्रांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे भटक्या कुत्र्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Local Body Election : मोठी बातमी! बारामतीमध्ये २ प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर, कारण काय?

School Closed: मोठी बातमी! ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता; कारण काय?

PF Balance Check: UAN नंबरशिवायही चेक करता येईल बॅलन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Hair Wash: विवाहित महिलांनी या ३ दिवशी चुकूनही केस धुवू नये? नाहीतर...

SCROLL FOR NEXT