Chandrakant Patil
Chandrakant Patil Saam Tv
मुंबई/पुणे

महिला आयोगाने चंद्रकांत पाटलांकडून 'त्या' वक्तव्याबाबत मागविला खुलासा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका करताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता पाटील यांच्या विरोधात राज्य महिला आयोगाकडे काल तक्रार दाखल करण्यात आली. याबाबत आता राज्य महिला आयोगाने चंद्रकांत पाटील यांच्याकडून खुलासा मागविला आहे.

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याबाबत काल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याकडे लिगल सेलकडून ही तक्रार दाखल करण्यात आली होती. चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षण आंदोलनावेळी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. याबाबत आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगास तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत.

महिला आज स्वकर्तुत्वावर शिक्षण, व्यवसाय, समाजकारण व राजकारणासह सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य समस्थ महिला वर्गाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचविणारे आहे. एका लोकप्रतिनिधीकडून असे वक्तव्य होणे ही खेदाची बाब आहे. यापुढे महिलांचा सन्मान राखला जाईल याचे भान चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राखावे. तसेच केलेल्या वक्तव्याबाबत लेखी खुलासा राज्य महिला आयोगास सादर करण्याबाबतचे निर्देश चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलेले आहेत.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

ओबीसी आरक्षणावरुन सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली होती. या टीकेली उत्तर देताना पाटील यांनी हे वक्तव्य केलं होतं. सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, 'तुम्ही राजकारणात कशासाठी राहता, घरी जा, स्वयंपाक करा. ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी दिल्लीत जा,अन्यथा मसणात जा पण आरक्षण द्या; तुम्ही खासदार असून तुम्हाला एका मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची हे कळत नाही?' अशा कडक शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका केली होती. त्यांच्या या टीकेमुळे पाटील य़ांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात येत आहे. पाटील यांच्या विरोधात वकील असिम सरोदे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, पाटील यांच्या या विधानावरुन शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) म्हणाल्या, माध्यमांशी बोलताना भाजपकडून महिलांबाबत नेहमीच खालच्या पातळीवर टीका केली जाते. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने सध्या महागाईशी लढणाऱ्या देशभरातील सर्व महिलांचा अपमान झाला असून, सुप्रिया सुळेंसह देशभरातील महिलांची चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी असं वक्तव्य केलं आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : वादविवाद टाळा, बेताने वागा; वृषभसह ४ राशींना आज 'या' गोष्टी घ्यावी लागणार काळजी

Rashi Bhavishya : 'या' राशींना आज मिळेल सुखाचा गारवा, वाचा राशिभविष्य

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

SCROLL FOR NEXT