Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Numerology: अंकशास्त्रात, जन्मतारखेच्या आधारे एखाद्या व्यक्तीबद्दल भविष्यवाणी केली जाऊ शकते. या शास्त्रानुसार, काही तारखांना जन्मलेले लोक फसवणारे आणि आपला विश्वासघात करणारे असतात याचीही माहिती मिळते
Numerology
Numerologygoogle

अंकशास्त्रात, जन्मतारखेच्या आधारे एखाद्या व्यक्तीबद्दल भविष्यवाणी केली जाऊ शकते. या शास्त्रानुसार, काही तारखांना जन्मलेले लोक फसवणारे आणि आपला विश्वासघात करणारे असतात याचीही माहिती मिळते. हे लोक कोणापुढेही तुमचं रहस्य किंवा तुमची महत्त्वाच्या गोष्टी इतरांनाही सांगू शकतात, यामुळे अशा लोकांकडून निष्ठेची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. चला आज आपण अशा काही तारखा जाणून घेऊ.

या तारखांना जन्मलेले लोक विश्वासार्ह नसतात

महिन्याची तीन तारीख

अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या ३ तारखेला जन्मलेले लोक खूप मिळून मिसळून राहणारे असतात, परंतु ते अगदी स्पष्ट आणि बोलकेदेखील असू शकतात. त्यांना गर्दीत राहायला आवडते. म्हणजे घोळक्यात गप्पा करायला त्यांना आवडतं. त्यामुळे ग्रुपमध्ये गप्पा करताना ते सहजगत्या तुमचं रहस्य उघडं करू शकतात. संधी मिळाल्यास ते फसवणूकही करू शकतात.

महिन्याची ८ तारीख

या तारखेला जन्मलेले लोक खूप जिज्ञासू असतात. स्वभावानुसार तुमची किंवा एखाद्या वस्तूंची माहिती गोळा करण्याचा छंद या तारखेला जन्मलेल्या लोकांचा असतो. परंतु याचबरोबर ते मिळवलेली माहिती इतरांना सुद्धा सांगू शकतात. वेळ आणि परिस्थितीनुसार, अशा व्यक्ती ब्लॅकमेलिंगसाठी एखाद्याची वैयक्तिक माहिती देखील वापरू शकतात.

जन्म तारीख १४

अंकशास्त्रानुसार, महिन्याच्या १४ तारखेला जन्मलेले लोक खूप मैत्रीपूर्ण आणि सामाजिक तसेच खूप बोलके असतात. सामाजिकता आणि ते इतरांशी सहज जुळवून घेत असतात, परंतु त्यांचे बोलणे इतरांसाठी हानिकारक असू शकते. कारण ते संभाषण दरम्यान काहीही माहिती घेऊन दुसऱ्याला सांगू शकतात. तसेच ते तुमची फसवणूक सुद्धा करू शकतात.

जन्म तारीख २७

अंकशास्त्रानुसार महिन्याच्या २७ तारखेला जन्मलेल्या व्यक्ती खूप सामाजिक असू शकतात. त्यांना इतरांशी जुळवून घेणं आवडत असतं. त्यांची माहिती घेत असतात, त्याची चर्चा सुद्धा करत असतात. परंतु ते स्वतःच्या वैयक्तिक विषयांवर इतरांशी चर्चा करण्यातही वेळ घालवत नाहीत. तसेच हे लोक अफवा पसरवण्यात पटाईत असतात.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Numerology
Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com