Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

Rashi Surya Gochar : सूर्य देव मेष राशीमध्ये असून ते १४ मे रोजी गोचर करत म्हणजेच संक्रमण करत वृषभ राशीत प्रवेश करतील. वृषभ राशीत सूर्याने संक्रमण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण वृषभ शुक्राच्या राशीत आहे. जे धन, वैभव, भैतिक सूख देत असते.
Rashi Surya Gochar
Rashi Surya Gochar google

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो आणि वर्षभरात १२ राशींचे चक्र पूर्ण करत असतो. यावेळी सूर्य देव मेष राशीमध्ये असून ते १४ मे रोजी गोचर करत म्हणजेच संक्रमण करत वृषभ राशीत प्रवेश करतील. वृषभ राशीत सूर्याने संक्रमण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण वृषभ शुक्राच्या राशीत आहे. जे धन, वैभव, भैतिक सूख देत असते.

सूर्य शुक्राच्या राशीत प्रवेश केल्याने सर्व राशींवर त्याचा परिणाम होणार आहे. सूर्य १५ जूनपर्यंत वृषभ राशीत राहील. या काळात ६ राशीच्या लोकांना विशेष लाभ देईल. या लोकांचे नशीब सूर्यासारखे चमकेल असे म्हणता येईल. या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते आणि त्यांच्या पगारात वाढ होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊ सूर्यासारखे नशीब चमकवणाऱ्या कोणत्या आहेत.

मेष

सूर्याचा हा राशीत संक्रमण होण्याने मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. आर्थिक बाजू मजबूत राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. करिअरमध्ये प्रगती होईल.

वृषभ

सूर्याचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांनाही खूप लाभ देणारं असेल. या राशीतील अनेक लोकांना त्यांच्या आवडीचे काम मिळू शकतं. पदोन्नती-वाढ मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणारे लोक आता ते अंमलात आणू शकतात.

कर्क

या राशीच्या लोकांसाठी आर्थिक प्रगतीची दारे या काळात खुली होण्याची शक्यता आहे. या राशीतील अनेकांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तर काही लोकांना पदोन्नतीची, पगारात वाढ होण्याची शक्यता या काळात आहे. ज्या लोकांचा व्यवसाय आहे त्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

सिंह

सिंह राशीचा स्वामी सूर्य देव आहे आणि तो त्यांच्यावर नेहमी दयाळू असतो. करिअरमध्ये तुम्हाला फायदा होईल. जुन्या अडचणी दूर होतील. नोकरी-व्यवसायात स्थिरता राहील. तुमची कीर्ती वाढेल.

कन्या

या राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण चांगले राहील. एक महिन्याचा कालावधीत ते त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करतील. तुम्हाला चांगल्या ऑफर्स मिळतील. व्यापारी वर्ग नवीन योजनांवर काम करतील.

धनू

या राशीमधील लोकांसाठी सुद्धा सूर्याचं संक्रमण फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला मोठी संधी मिळू शकते. अनेकांची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वडिलांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com