मुंबई: परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरील ईडी कारवाईनंतर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झालेले आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मालमत्ता कराचे पुरावे दाखवत मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) आणि अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना किरीट सोमय्या यांची जीभ घसरली (Offensive Comment) आहे. आता पुढचा नंबर मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याच्या असल्याचा इशाराही सोमयया यांनी दिला आहे.
हे देखील पाहा -
ईडीच्या सुरु असलेल्या कारवाई संदर्भात दापोलीतील रिसॉर्टशी माझा कोणताही संबंध नाही असा दावा काल मंत्री अनिल परब यांनी केला. यावर प्रत्युत्तर देत किरीट सोमय्या यांनी दापोलीतील २५ कोटीचा रिसॉर्ट यांचा आहे, असं सांगत मालमत्ता कराच्या पावत्या दाखवत टीका करत असताना सोमय्या त्यांची जीभ घसरली. उद्धव ठाकरे यांनी १९ बंगल्यांचं नाटक केलं, आता परब नाटक करत आहे, त्यांना नोबेल मिळालं पाहिजे. असा खोटारडा मुख्यमंत्री महाराष्ट्राने याआधी पाहिला नाही असं वक्त्यव्य करताना किरीट सोमय्या यांची जीभ घसरली. तसेच परब यांची कारवाई पूर्ण झाल्यानंतर यशवंत जाधव यांची कारवाई सुरू होणार त्यानंतर मुख्यमंत्री यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडी करवाई होणार असून पुढचा नंबर त्यांचा असल्याचा इशारा देत सोमय्या यांनी श्रीधर पाटणकर हाजिर हो... अशी खोचक टीका केली आहे.
ईडीच्या छापेमारीनंतर राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच आता किरीट सोमय्या यांनी पुरावे देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्याचबरोबर किरीट सोमय्यांना कोणावर कधी कारवाई होणार याची संपूर्ण माहिती कशी आहे? असा प्रश्न राजकारणात निर्माण झाला आहे. त्यामुळेच किरीट सोमय्या हे इडीचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल अरविंद सावंत यांनी केला आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.