State Government Decision For Toll  
मुंबई/पुणे

Toll Free Mumbai Goa Highway : बाप्पा पावला! गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या भक्तांना टोलमाफी, सरकारनं आदेशच काढला!

Bharat Jadhav

State Government Decision For Toll :

राज्य सरकारने गणेश भक्तांसाठी खूशखबर दिलीय. गणेश गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांना टोलमुक्तीला लाभ मिळणार आहे. गणेशोस्तवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी आणि इतर सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. शासनने या निर्णयाचे परिपत्रक काढले आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबईतून मोठ्या प्रमाणात गणेश भक्त कोकणात जात असतात. या गणेश भक्तांसाठी सरकारने एक खुशखबर दिलीय. यंदा गणेशोस्तवाकरिता कोकणात जाणाऱ्या भाविकांना वाहनांना सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होतं. त्या अनुषंगाने दि.०५.०९.२०२४ ते दि.१९.०९.२०२४ या कालावधीत मुंबई बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गर, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल माफ करण्याचे निर्देश सरकारने दिलेत. कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांना आणि वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना सवलत देण्यात येत आहे.

लाभ कसा मिळणार

ज्या भाविकांना टोलमाफी हवी आहे, त्यांना एक छोटं का करावं लागणार आहे. भाविकांना आपल्या वाहनावर "गणेशोस्तव २०२४, कोकण दर्शन" अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पासेस त्यावर गाडी क्रमांक चिटकावे लागणार आहे. चालकाचे नांव असा मजकूर नमूद करुन ते स्टीकर्स चिटकावे लागेल. आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ) यांनी समन्वय साधून पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. ऑफिसेसमध्ये हे स्टीकर्स मिळतील.

गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ज्यादा बस धावणार

येत्या ७ सप्टेंबर २०२४ रोजी श्री गणरायाचे आगमन होत आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. गणेशोत्सव कोकणातील चाकरमान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. ही गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात आल्या मात्र आता एसटी महामंडळाकडून संप पुकारण्यात आलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT