Eknath shinde And Devendra fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

सरकारकडूनही संभाजी महाराजांचा 'स्वराज्यरक्षक' म्हणून उल्लेख, याच उपाधीवरुन सत्ताधारी-विरोधक भिडलेले

सरकारनेच स्वराज्यरक्षक उल्लेख केल्यानं विविध चर्चांना उधाण आलं आहे.

सूरज सावंत

मुंबई : हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा केला होता. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने संभाजीराजेंचा धर्मवीर असा उल्लेख करत अजित पवारांवर हल्लाबोल केला होता. मात्र आता सरकारकडून छत्रपती संभाजी महाराज यांचा स्वराज्यरक्षक असाच उल्लेख करण्यात आला आहेत. (Political News)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पुरवणी मागण्या मांडल्या. या पुरवणी मागण्यांमध्ये सरकारकडून स्वराज्यरक्षक असाच उल्लेख करण्यात आला आहे. मात्र एकीकडे भाजप आणि शिंदे गटानं संभाजी महाराजांचा धर्मवीरच उल्लेख करणार असंही म्हटलं होतं. त्यानंतर आता सरकारनेच स्वराज्यरक्षक उल्लेख केल्यानं विविध चर्चांना उधाण आलं आहे. (Latest News)

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं की, छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर यावरुन राज्यात वाद उभा राहिला होता. अखेर यावर आता पडदा पडून छत्रपती संभाजी महाराज स्वराजरक्षक असल्याचा उल्लेख अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आला.

छत्रपती संभाजी महाराजांच्या एकंदरीत कार्याचा विचार करुन स्वराज्यरक्षक ही बिरुदावली योग्य असल्याचे मत खासदार अमोल कोल्हेंनी मांडलं. आज अखेर या विधानाला राज्य सरकारने एक प्रकारे दुजोराच दिल्याचे दिसून आल्याने खासदार कोल्हेंनी राज्य सरकारचे आभारही मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपची पुणे महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

SCROLL FOR NEXT