NCP News: सोशल मीडियावर ईव्हीएम मशीनचा फोटो शेअर करणं पडलं महागात; राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील-ठोंबरेंवर गुन्हा

Rupali Patil Thombare: राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांना पुणे कसबा पोटनिवडणुकीच्या मतदारादरम्यान ईव्हीएम मशीनचा फोटो शेअर करणं पडलं महागात पडलं आहे
Rupali Patil NCP
Rupali Patil NCPSaamtv

सचिन जाधव

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांना पुणे कसबा पोटनिवडणुकीच्या मतदारादरम्यान ईव्हीएम मशीनचा फोटो शेअर करणं पडलं महागात पडलं आहे. रुपाली पाटील-ठोंबरे यांनी सोशल मीडियावर ईव्हीएम मशीनचा फोटो शेअर केल्याने पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Marathi News)

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने, मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) रूपाली पाटील या तिघांविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर यांच्यावर वेगवेगळ्या प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Rupali Patil NCP
Pune News: 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैसे वाटले..' रवींद्र धंगेकर यांचा मोठा आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या मतदानाला ४८ तासांत असतानाच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप केल्यावरून उपोषण केले. त्यानंतर आचारसंहितेचा त्यांनी भंग केल्याने त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तर मतदानाच्या दिवशी रविवारी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी भाजपचे चिन्ह असलेला मफलर मतदान केंद्रावर येताना गळ्यात घातला होता.

Rupali Patil NCP
Mumbai: 'राज्याच्या राजकारणाचा चिखल झालाय...' राज ठाकरेंचा संताप, म्हणाले; '22 तारखेला डायरेक्ट...'

मतदान केंद्राजवळ जाताना चिन्ह दर्शविणारे अथवा मतदानाचा प्रलोभन दाखवणारे कोणतेही कृत्य आचारसंहितेचा भंग केल्याचे मानले जाते. याबाबत त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली. तर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil) यांनी मतदान केलेले मतदान यंत्राचा फोटो व्हायरल केल्याने त्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे त्यांच्यावर काय कारवाई होणार, हे पाहावे लागणार आहे. या तिघांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com