VIDEO: विधानभवनाच्या पायऱ्यांवरून उतरताना CM शिंदेंचा तोल गेला, इतक्यात भाजपच्या नेत्यानं सावरलं...

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesaam tv

>>सुशांत सावंत

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. आज राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे. हे अधिवेशन 25 मार्चपर्यंत सुरु राहणार असून वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकासआघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांना अटक करण्यासाठी प्रयत्न केले होते असा गंभीर आरोप केला आहे. यानंतर राज्यातील राजकारणाचा पारा चढला आहे. एकीकडे शिंदे यांनी महाजनांचा संदर्भ देत महाविकास आघाडीवर आरोप केला तर दुसरीकडे या दोघांची मैत्री पहायला मिळाली.

CM Eknath Shinde
Eknath Shinde: लवकरच 'मराठी'ला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीनंतर दिल्लीत महत्त्वाची बैठक

विधीमंडळाचं कामकाज संपल्यानंतर विधान भवनातून बाहेर पडताना अशी एक गोष्ट घडली ज्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्यातील मैत्रीची एक झलक पहायला मिळाली.

विधानभवनातून बाहेर पडताना पायऱ्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तोल गेला, मात्र त्यांच्या सोबत चालणारे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांना सावरले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

CM Eknath Shinde
Farmer News: शेतकऱ्याची थट्टा! 95 किलो वांग्याचे मिळाले अवघे 66 रुपये; संतापाने 11 गुंठ्यातील वांग्याचे पीकचं टाकले उपटून

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी 'मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्याचं एक शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींची भेट घेईल अशी माहिती दिली. (Latest Political News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com