Eknath Shinde: लवकरच 'मराठी'ला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीनंतर दिल्लीत महत्त्वाची बैठक

गृहमंत्री अमित शाह मराठी भाषेसाठी लक्ष घालणार असल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे सचिव श्रीनिवासन राव यांनी दिली आहे.
Eknath shinde News
Eknath shinde News saam tv

Mumbai: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात दिल्लीत महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंबंधित शिवसेनेचे खासदार आणि गटनेते राहुल शेवाळे यांनी साहित्य अकादमीच्या सचिवांची घेतली भेट घेतली. यावर स्वतः अमित शाह लक्ष घालणार असल्याचे केंद्र सरकार तर्फे सचिव श्रीनिवासन राव यांनी सांगितले आहे. लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी सभागृहात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडून करण्यात आली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते.

Eknath shinde News
Farmer News: शेतकऱ्याची थट्टा! 95 किलो वांग्याचे मिळाले अवघे 66 रुपये; संतापाने 11 गुंठ्यातील वांग्याचे पीकचं टाकले उपटून

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यभरात आज मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा होत आहे. सरकारकडूनही यानिमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषा हे आपल्या जगण्याचे साधन असते असे म्हणत आपल साहित्य हे अमुल्य ठेवा असून, मराठीचा जास्तीत जास्त वापर आपल्याला करता आला पाहिजे, असे म्हणले आहे.

तसेच मराठी साहित्य आणि भाषेचा प्रचार आणि प्रसार आज केला जात आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी आपले सरकार काम करत आहे, असे म्हणत वाचनसंस्कृती वाढवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

Eknath shinde News
Sushma Andhare: 'कणखर बाणा गळून पडलाय, मनाची घालमेल होतेय...' सुषमा अंधारेंची भावूक पोस्ट व्हायरल; नेमकं काय घडलं?

पंतप्रधानांची भेट घेण्याचे दिले आश्वासन..

आजच्या अधिवेशनात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सभागृहात उपस्थित केला. यावर सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेवून लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेईल आणि त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी विनंती करण्यात येईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली.

दरम्यान, "मी डाओसला गेलो होतो तिकडे देखील मराठी माणसे दिसली. जी भाषा माणुसकी शिकवते ती भाषा विश्वाची भाषा बनते. आणि हे सर्व गुण आपल्या भाषेत आहेत," अशा भावनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com