मुंबई : राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात Maharashtra Government विलगीकरण करण्यात यावे, या मागणीकरिता मागील अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर ST employees strike गेले आहेत. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर हायकोर्टात पोहोचले आहे. कर्मचारी आपल्या मागणीवर ठामपणे असल्याने संप हा सुरूच ठेवला आहे.
राज्य सरकारने काही अटी मान्य केले आहेत. पण, तरीही संघटना आंदोलनावर ठामपणे उभी राहिली आहे. यामुळे आता राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारत ३७६ संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची धडक कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता एसटी कर्मचारी आज मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत हा मोर्चा होत आहे.
हे देखील पहा-
मुंबई मंत्रालय या ठिकाणी होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास महाराष्ट्रातून अनेक एसटी कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आहे. परंतु, मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यांवर मानखुर्द चेकपोस्ट या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावून एसटी कर्मचाऱ्यांना अडवले जात आहे. याचाच निषेध व्यक्त करत सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत मानखुर्द जकात नाक्यावर ठिय्या आंदोलनला सुरूवात केली आहे.
आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत, ही आता आर या पारची लढाई आहे ,अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याकरिता राज्यभरामधून एसटी कर्मचारी मुंबईत दाखल होत आहेत. राज्य सरकारने काही अटी मान्य केले आहेत. पण, तरीही संघटना आंदोलनावर ठाम आहे. यामुळे आता राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारत ३७६ संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची धडक कारवाई करण्यात आली आहे. राज्यामधील ४५ डेपोतील ३७६ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.