सातारा हादरलं! शेतातील पाण्यावरून सख्खा भाऊ झाला पक्का वैरी...
सातारा हादरलं! शेतातील पाण्यावरून सख्खा भाऊ झाला पक्का वैरी... Saam Tv

सातारा हादरलं! शेतातील पाण्यावरून सख्खा भाऊ झाला पक्का वैरी...

सातारा जिल्ह्याच्या म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका वयोवृद्धाची काठीने आणि धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली
Published on

सातारा : सातारा जिल्ह्याच्या म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका वयोवृद्धाची काठीने आणि धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शेतीच्या पाण्यावरून वाद झाल्यावर सख्ख्या भावानेच आपल्या मुलाच्या मदतीने त्याचा निर्घृण हत्या करण्यात आली आहे. संबंधित घटना सोमवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी मृत व्यक्तीच्या मुलाने आपल्या चुलत्यासह त्याच्या मुलावर खुनाचा गुन्हा दाखल FIR करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास म्हसवड पोलीस करत आहेत. आण्णा धुळा वाघमोडे असे हत्या झालेल्या ७५ वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. ते वरकुटे मलवडी याठिकाणील रहिवासी आहे.

हे देखील पहा-

मृत आण्णा वाघमोडे सोमवारी रात्री आपल्या शेतात ज्वारीला पाणी देण्याकरिता गेले होते. रात्री २ वाजेच्या सुमारास वीज येणार असल्याने ते ज्वारीच्या शेतातच झोपले होते. यावेळी आरोपी मारुती धुळा वाघमोडे आणि पुतण्या आबा मारुती वाघमोडे याठिकाणी आले होते. त्यांनी मृत आण्णा यांना झोपेतून उठवले. आणि आम्हाला शेतातून पाणी नेऊ दे, अशी परवानगी मागितली होती.

पण मृत आण्णा यांनी शेतातून पाणी घेऊन जाण्यास नकार दिल्याने, त्यांनी संतापलेल्या दोघांनी संगनमताने कुऱ्हाड, दगड आणि काठीने मारहाण करण्यास सुरवात केली आणि गंभीर जखमी केले आहे. या मारहाणी ७५ वर्षीय आण्णा वाघमोडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मृताचा मुलगा सदाशिव अण्णा वाघमोडे याने म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

सातारा हादरलं! शेतातील पाण्यावरून सख्खा भाऊ झाला पक्का वैरी...
Amravati : परतवाडा- अंजनगाव मार्गावर ट्रकने चिरडल्या 100 मेंढ्या

पोलिसांनी मारुती धुळा वाघमोडे आणि त्यांचा मुलगा आबा मारुती वाघमोडे यांच्याविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. शेतीच्या पाण्याकरिता सख्ख्या भावाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस येताच गावात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास म्हसवड पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com