Maharashtra Board 10th Result 2024 Saam TV
मुंबई/पुणे

10th SSC Result : पोरांपेक्षा पोरीच ठरल्या सरस, गुणवंतांचा टक्काही वाढला; वाचा दहावीच्या निकालाची महत्वाची वैशिष्ट्ये

Maharashtra Board 10th Result 2024 : यंदा दहावी परीक्षेचा निकाल ९५. ८१ टक्के इतका लागला. निकालाची खास बाब म्हणजे यंदाही मुलांपेक्षा मुलीच वरचढ ठरल्या आहेत.

Satish Daud

सर्वांनाच उत्सुकता लागून असलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला. यंदा दहावी परीक्षेचा निकाल ९५. ८१ टक्के इतका लागला. निकालाची खास बाब म्हणजे यंदाही मुलांपेक्षा मुलीच वरचढ ठरल्या आहेत.

नुकताच बोर्डाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला होता. या निकालातही मुलींनीच बाजी मारली होती. यंदा दहावीच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आल्या होत्या. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, कोकण, अमरावती, लातूर, नागपूर विभागांमार्फत परीक्षांचं आयोजन करण्यात आलं होतं.

राज्यातील एकूण १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. महत्वाची बाब म्हणजे अनेक केंद्रावर कॉफीमुक्त परीक्षा पार पडली होती. त्यामुळे परीक्षेचा निकाल नेमका काय लागणार? याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागून होतं. दरम्यान, यंदाच्या दहावीच्या निकालाची काही महत्वाची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात...

दहावी परीक्षेच्या निकालाची महत्वाची वैशिष्ट्ये

  • यंदा दहावी परीक्षेचा निकाल ९५.८१ टक्के लागला.

  • यंदाही कोकण विभागाने बाजी मारली. कोकणाचा निकाल ९९.१ लागला.

  • दहावी परीक्षेत यंदा एकूण ९४.५६ टक्के मुले उत्तीर्ण झाली.

  • मुलींचं उतीर्ण होण्याचं प्रमाण ९७ टक्के इतकं आहे.

  • मुलांपेक्षा जवळपास ३ टक्के अधिक मुली उतीर्ण झाल्या आहेत.

  • गेल्यावर्षी दहावी परीक्षेचा निकाल ९३. ८३ टक्के लागला होता.

  • यंदा गुणवंतांचं प्रमाणही वाढलं आहे. निकाल १.९८ टक्क्यांनी वाढला.

  • अनेक शाळांचे निकाल १०० पैकी १०० टक्के लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath : अंबरनाथकरांसाठी गुड न्यूज! पाणी टंचाईची झंझट संपणार, नालिंबी जलशुद्धीकरण प्रकल्प अंतिम टप्प्यात

लग्न आटपून घरी परतताना भीषण अपघात! सिमेंट मिक्सर अन् रिक्षाची धडक; २ जणांचा जागीच मृत्यू, ७ जखमी

धुरंधर फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, लग्नाआधीच कपलला आहेत २ मुलं

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

Ladki Bahin Yojana : ई-केवायसी करताना चूक झाली, आता काय कराल? लाडक्या बहि‍णींसाठी सरकारची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT