महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) 27 मे म्हणजेच सोमवारी दहावीचा निकाल (SSC Result) जाहीर करण्यात येणार आहे. दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक निकाल लागण्याची वाट पाहत होते. अखेर त्यांची ही प्रतीक्षा सोमवारी संपणार आहे. सोमवारी दुपारी १ वाजता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाईन पाहायला मिळणार आहे. mahresult.nic.in या वेबसाईटवर विद्यार्थी निकाल पाहू शकतात. त्याचसोबत डिजीलॉकरवर देखील विद्यार्थी निकाल पाहू शकतात.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावीची परीक्षा घेण्यात आल्या होत्या. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. राज्यात जवळपास १६ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. दहावीची परीक्षा ९ विभागीय मंडळांतर्फे म्हणजेच पुणे, नागपूर, औरंगबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नाशिक आणि कोकण येथे आयोजित करण्यात आली होती. सोमवारी दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.
- https://mahresult.nic.in/
- https://sscresult.mkcl.org/
- https://sscresult.mahahsscboard.in/
- https://results.digilocker.gov.in/
- mahresult.nic.in या किंवा वरती देण्यात आलेल्या कोणत्याही अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- मुख्यपृष्ठावर उपलब्ध महाराष्ट्र SSC Result 2024 लिंकवर क्लिक करा.
- लॉग इन तपशील भरा आणि सबमिटवर क्लिक करा.
- एंटर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.
- निकाल डाउनलोड करा आणि प्रिंट काढा.
- डिजीलॉकरच्या वेबसाईटवर किंवा तुमच्या मोबाईलमधील डिजीलॉकर अॅपवर जा.
- महाराष्ट्र बोर्डाचा पर्याय निवडा. त्यानंतर दहावीचा निकाल हा पर्याय निवडा
- त्याठिकाणी आवश्यक असलेली माहिती भरा
- याठिकाणी तुमचा निकाल दिसेल. निकालाची प्रत डाऊनलोड करुन प्रिंट काढा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.