SSC-HSC Exam 2023  Saam TV
मुंबई/पुणे

SSC-HSC Exam Schedule : दहावी-बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, पहिला पेपर कधी?

Maharashtra SSC-HSC Exam Time Table: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावी संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे

Vishal Gangurde

सचिन जाधव

SSC HSC Exam Latest News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावी संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीची परीक्षा १ मार्च २०२४ ते २२ मार्च २०२४ कालावधीत होणार आहे. तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते २३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये इयत्त दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रकर मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

मंडळाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचे नियोजन व्हावे आणि त्यांच्या मनावरील ताण कमी व्हावा, या दृष्टीकोनातून फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या लेखी परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार आयोजित करण्यात येणार आहे .

तत्पूर्वी, मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परंतु दहावी आणि बारावीच्या परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांना छापील स्वरूपात वेळापत्रक देण्यात येणार आहे. तेच वेळापत्रक अंतिम असेल, अशीही माहिती मंडळाने दिली.

दरम्यान, अन्य संकेतस्थळ, अन्य यंत्रणेने छपाई केलेले, व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेलेले वेळेपत्रक ग्राह्य धरू नये, अशा सूचना देखील मंडळाने दिल्या आहेत. याचबरोबर प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येणार आहे.

सदर वेळापत्रकांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात, अशीही माहिती मंडळाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyebrow Growth: पातळ आयब्रोमुळे चेहऱ्याची शाईन गेलेय? या २ उपायांनी होईल चमत्कार, तुम्हीच दिसाल उठून

Maharashtra Live News Update: मावळच्या नवलाख उंब्रे येथे उद्यापासून रंगणार 'मावळ केसरी' कुस्तीचा थरार

Pune Municipal Elections: पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची बोलणी का फिस्कटली? शरद पवार गटाचा मोर्चा पुन्हा मविआकडे

Girija Oak: अभिनेत्री गिरीजा ओक कुठे राहते?

पुण्यातील उच्चशिक्षित जोडपं लव्ह मॅरेजनंतर २४ तासांच्या आत झालं वेगळं; कारण फक्त एवढंच

SCROLL FOR NEXT