Ramdev Baba News: आगामी निवडणुकीत PM मोदींचा पराभव होणार का? रामदेव बाबांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

Ramdev Baba News: आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव होणार का, या प्रश्नावर योगगुरू रामदेव बाबा यांनी मोठं भाष्य केलं आहे.
Ramdev Baba News:
Ramdev Baba News: Saam tv
Published On

सचिन जाधव

Ramdev Baba Latest News

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. तर भाजपच्या नेतृत्वात असलेल्या 'एनडीए' आघाडीनेही बैठकांचा सपाटा लावला आहे. आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव होणार का, या प्रश्नावर योगगुरू रामदेव बाबा यांनी मोठं भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

योगगुरू रामदेव बाबा पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, रामदेव बाबा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. आगामी निवडणुकींवर भाष्य करताना रामदेव बाबा म्हणाले, 'महाराष्ट्रात जे घडलं, त्यात अजित पवार, शरद पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा हा तर ८० टक्के आणि २० टक्क्यांचा खेळ झाला आहे. महाराष्ट्रात आता नवं समीकरण बनलं आहे आणि देशातही असंच सुरू आहे'.

Ramdev Baba News:
Dahi Handi 2023: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने; आदित्य ठाकरेंच्या वरळीत आशिष शेलार 'परिवर्तना'ची दहीहंडी उभारणार

'राज्यात कोण निवडणूक जिंकेल याबद्दल सांगता येणार नाही. पण देशात २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींना कुणीच पराभूत करू शकणार नाही', असा दावा रामदेव बाबा यांनी केला आहे.

चांद्रयान मोहिमेविषयी भाष्य करताना रामदेव बाबा म्हणाले, ' चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आजपर्यंत कोणताही देश गेला नव्हता, तिथे आपण पोहोचलो आहोत. आपला पराक्रम आता संपूर्ण जगाने पाहिला आहे. ही तर भारताच्या विश्व विजयाची उड्डाण आहे. आता आपल्याला संपूर्ण ब्रह्मांडांची रहस्य जगाला द्यायची आहेत'.

'देशात सत्तेत असणाऱ्या लोकांची नियती , नेतृत्व आणि नीती यामुळे देश पुढे जात आहे. येणारा काळ भारताचा असेल. 2047 च्या पूर्वीच आपल्या देश जगातील आर्थिक आणि अध्यात्मिक महासत्तेचा केंद्र बनेल. राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचा नेतृत्व आणि देशात असणारे मोदींचे नेतृत्व हे भारताला महाशक्ती बनवण्यासाठी पुढे जात आहे, असेही ते म्हणाले.

Ramdev Baba News:
Mhada Lottery News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या 1 लाख घरांसाठी निघणार लॉटरी; जाणून घ्या संपूर्ण माहिती...

महागाईविषयी बोलताना रामदेव बाबा म्हणाले, 'देशासमोर अनेक प्रश्न आहेत. अडचणी आहेत. त्यात आपला देश पुढे जात आहे हे देखील सत्य आहे'. याचदरम्यान, राज्यातील राष्ट्रवादीच्या फुटीवर भाष्य करताना रामदेव म्हणाले, 'शरद पवार आणि अजित पवारांचा राजकारण महाराष्ट्रासाठी शुभ आणि मंगल आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com