Paduka Darshan Sohala 2024  Sri Family Guide
मुंबई/पुणे

Paduka Darshan Sohala 2024: नवी मुंबईत आजपासून 'श्रीगुरू पादुका दर्शन सोहळा', भाविकांसाठी विनामूल्य प्रवेश

Navi Mumbai Free Event Today: २६ आणि २७ मार्च असा दोन दिवस हा पादुका दर्शन सोहळा वाशी येथे रंगणार आहे. सकाळी १०.३० ते रात्री ९.३० या वेळेत पादुकांचे दर्शन घेता येणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Paduka Darshan Sohala 2024 :

नवी मुंबईत आजपासून (२६ मार्च) 'श्रीगुरू पादुका उत्सव' सोहळा पार पडणार आहे. राज्यासह देशभरातील लाखो भाविकांना १८ श्रीगुरूंच्या पादुकांच्या चरणी लीन होण्याची संधी ‘संकल्प ते सिद्धी’ सोहळ्यानिमित्त उपलब्ध झाली आहे. वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे हा या भव्यदिव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. २६ आणि २७ मार्च असा दोन दिवस हा पादुका दर्शन सोहळा वाशी येथे रंगणार आहे. सकाळी १०.३० ते रात्री ९.३० या वेळेत पादुकांचे दर्शन घेता येणार आहे.

अनेकांचं श्रद्धास्थान असलेल्या गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता ‘सकाळ माध्यम समूहा’ने आनंदी जीवनशैलीसाठी मार्गदर्शक ‘श्री फॅमिली गाईड’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत सामाजिक, आध्यात्मिक, शारीरिक आणि आर्थिक प्रगती साधण्यासाठी ‘संकल्प ते सिद्धी सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून २६ आणि २७ मार्चला ‘श्रीगुरू पादुका उत्सव’ साजरा होत आहे.

१८ श्रीगुरूंच्या पादुका

संत ज्ञानेश्वर महाराज (नेवासा), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत नामदेव महाराज (घुमान), संत जनाबाई (गंगाखेड), संत नरहरी सोनार (पंढरपूर), संत सेना महाराज (पंढरपूर), संत निळोबाराय महाराज (पिंपळनेर), श्रीगुरू महाअवतार बाबाजी (सौजन्य - श्री एम), श्री रामदास स्वामी (सज्जनगड), श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट), श्री साईबाबा (शिर्डी), श्री टेंबे स्वामी महाराज (माणगाव), श्री गजानन महाराज (शेगांव), परमसद्‌गुरू गजानन महाराज (शिवपुरी), संत वेणाबाई (मिरज), श्री शंकर महाराज (धनकवडी), श्री गुळवणी महाराज (पुणे) आणि श्रीगुरू बालाजी तांबे (कार्ला) यांच्या पादुकांचा आशीर्वाद सोहळ्यात घेता येणार आहे.

आध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शन

श्रीगुरू बालाजी तांबे यांच्या आशीर्वादाने पादुका दर्शन सोहळा होत आहे. सोहळ्यात आध्यात्मिक गुरू श्री एम मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ५००० भाविक एकाच वेळी अग्निहोत्र करणार आहेत. सोबतच ओंकार जप आणि धुनी प्रज्वलन होणार आहे. त्यासाठी श्रीगुरू पादुका मंदिरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शन आणि सत्संग व आर्थिक सुबत्तेसाठी कृतिशील प्रशिक्षण मिळणार असून आनंदी जीवनशैलीकडे व भौतिक विकासाकडे वाटचाल करण्यास मदत होणार आहे.

शंकर महादेवन आणि हरिहरन यांचे सांगीतिक कार्यक्रम

या सोहळ्याला प्रसिद्ध गायक हरिहरन यांचा भक्तिगीतांचा संगीत सोहळा २६ मार्चला तर गायक-संगीतकार शंकर महादेवन यांचा संगीत सोहळा २७ मार्च रोजी रंगणार आहे. श्रीगुरू पादुका मंदिराच्या शेजारील खुल्या मैदानात या सांगीतिक कार्यक्रमासाठी भव्यदिव्य मंच उभारण्यात आला आहे.

विनामूल्य प्रवेश

नागरिकांना विनामूल्य पादुका दर्शन सोहळ्याला हजेरी लावता येणार आहे. त्यासाठी क्यूआर कोडद्वारे नोंदणी करावी लागणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल. अधिक माहितीसाठी ८८८८८३९०८२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Maharashtra Live News Update: भिवंडीतील नारपोली येथे बालाजी डाईंगला भीषण आग

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT