Pune Spray Gang
दुचाकीस्वारांकडून शाळकरी मुलींना लक्ष करून त्यांच्या अंगावर स्प्रे मारला जात असल्याचा विचित्र प्रकार पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात समोर आला आहे. कोयता गँगनंतर आता या स्प्रे गँगचा धुमाकळ सुरू झाल्यामुळे विद्यार्थिनींमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे.
आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावात एक आठवीत शिकणारी विद्यार्थीनी शाळेची सुट्टी झाल्यानंतर घरी जात होती. यावेळी दुचाकीवरून आलेल्या चार जणांच्या टोळीने या विद्यार्थीनीच्या तोंडावर स्प्रे मारला. हा वेगळाच प्रकार असल्याचे लक्षात येताच सोबतच्या मैत्रिणींनी आरडाओरडा केल्याने त्या अज्ञात दुचाकीस्वारांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हा स्प्रे मारल्यानंतर विद्यार्थीनीच्या अंगाला खाज येऊन सूज आली आहे. दरम्यान याबाबत मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अशा संशयास्पद व्यक्ती आढळल्यास संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.