गणेशोत्सवासाठी 2200 विशेष बसेस सोडणार कोकणात ! Saam Tv
मुंबई/पुणे

गणेशोत्सवासाठी 2200 विशेष बसेस सोडणार कोकणात !

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाही दरवर्षीप्रमाणे एसटीच्या विशेष बसेस गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक सर्वात आनंदाची बातमी आहे. यंदाही प्रत्येकवर्षी प्रमाणे एसटीच्या विशेष बसेस गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणार आहेत. राज्याच्या परिवहन महामंडळाच्या तब्बल 2200 बसेस ह्या कोकणात सोडण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री Minister of Transport अनिल परब Anil Parab यांनी अशी माहिती दिली आहे.

मुंबई, ठाणे, पालघर येथील मुख्य बसस्थानकातून या बसेस निघणार आहेत. ४ ते १० सप्टेंबर दरम्यान या गाड्या प्रवास करतील. त्यानंतर १४ सप्टेंबरपासून या बसेस परत येतील. तसेच या परतीच्या प्रवासासाठी बस बुकींग Booking येत्या १६ जुलैपासून सुरु होणार आहे.

हे देखील पहा-

कोरोना Corona Crises संकटामुळे गेल्यावर्षी वाहतुकीवर निर्बंध होते. यंदा मात्र कोरोनाचे नियम Rules लक्षात घेत गणेशोत्सवासाठी विशेष बसची सोय करण्यात आली. परंतु, पूर्ण प्रवासादरम्यान मास्क Face Mask घातलेला असणे बंधनकारक असणार आहे. तसंच प्रवास सुरु होण्यापूर्वी बसेसचे पूर्ण निर्जंतुकीकरण Sanitization करण्यात येणार आहे. या गाड्यांच्या प्रवास सुरळीत होण्यासाठी कोकणातील बस मार्गावर महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती Vehicle repair पथके थांबणार आहेत. प्रवाशांसाठी तात्पुरत्या प्रसाधानगृहांची सुद्धा उभारणी करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेची देखील सोय करण्यात आली आहे. यात मुंबई सीएसएमटी-सावंतवाडी-मुंबई सीएसएमटी, पनवेल-रत्नागिरी-पनवेल, पनवेल-सावंतवाडी रोड-पनवेल, आणि मुंबई सीएसएमटी-रत्नागिरी-मुंबई सीएसएमटी या Railway समावेश आहे. या विशेष रेल्वे संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर मिळणार आहे. तसेच रेल्वे इन्क्वायरी एनटीईएस अॅपवरही यासंदर्भात माहिती मिळू शकेल. त्याचबरोबर PRS आणि IRCTC अश्या काही वेबसाईटवरुनही इच्छुकांना बुकींग करता येणार आहे.

याच दरम्यान, गणेशोत्सवासाठीच्या 72 रेल्वे गाड्या फुल झाल्या आहेत. त्यामुळे अधिक गाड्या सोडण्याची मागणी भाजप BJP आमदार MLA आशिष शेलार यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे RaoSaheb Danave यांच्याकडे केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT