special block on pune mumbai expressway one hour on mumbai lane Saam TV
मुंबई/पुणे

Pune Mumbai Express Way: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा विशेष ब्लॉक, वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

Mumbai Pune Express Way Special Block: आयटीएमएस प्रणालीच्या कामासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे.

Satish Daud

Mumbai Pune Express Way Special Block

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. आयटीएमएस प्रणालीच्या कामासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर दुपार १२ ते १ या वेळेत हा ब्लॉक घेतला जाणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.  (Latest Marathi News)

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पुलाच्या अलीकडे अन् पलीकडे ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाणार आहे. त्यामुळे पुण्याकडून मुंबईकडे (Pune To Mumbai) जाणारी वाहतूक तब्बल १ तासांसाठी बंद असणार आहे. गॅन्ट्री बसविताना मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक उर्से टोल नाका येथे तसेच शोल्डर लेन वर पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे.

फक्त चारचाकी वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला असून लोणावळा एक्झिटवरुन खोपोली शहरातून पर्यायी रस्ता असणार आहे. विशेष बाब म्हणजे बुधवारी देखील मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दोन तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आळा होता. त्यामुळे वाहनचालकांना मोठा अडचणीचा सामना करावा लागला.

मात्र, प्रशासनाने कामाची तात्परता दाखवत दोन तासांचा विशेष ब्लॉक अर्ध्या तासातच संपवला होता. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्याला देशाच्या आर्थिक राजधानीसोबत जोडता यावं म्हणून मुंबई-पुणे एक्सप्रेस वे तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावरुन दिवसभरातून लाखो वाहने ये-जा करत असतात.

या मार्गावरून मुंबईला कमी वेळेत जात येत असल्याने सर्वजण. या मार्गाचा वापर केला जातो. अशातच महामार्गावर आज १ तासाचा विशेष ब्लॉक घेतला जाणार असल्याने प्रवासी नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT